तुमच्या मालमत्तेसाठी इच्छापत्र लिहिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Will : आपल्या देशात संपत्ती वरून मोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. संपत्तीच्या कारणांवरून अनेकदा वादविवादाचे स्वरूप मोठ्या भांडणात तयार होते. प्रॉपर्टीच्या भांडणातून कित्येकदा खून पडल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. यामुळे कुटुंबात भावाभावांमध्ये वैर वाढते. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात असे घडू नये असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या संपत्तीसाठी इच्छापत्र जरूर बनवले पाहिजे.

यामुळे तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती कोणाला जाणार, कोणाला किती संपत्ती मिळणार हे स्पष्ट होते. दरम्यान इच्छापत्र किंवा मृत्युपत्र बनवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे असाल आणि तुमच्याकडे काही संपत्ती, स्थावर मालमत्ता किंवा मग एलआयसी विमा पॉलिसी सारख्या विमा पॉलिसी असतील तर तुम्ही निश्चितच इच्छा पत्र बनवले पाहिजे. त्यासाठी मात्र तुम्ही मानसिकरीत्या फिट हवेत.

मृत्यू कधीही कोणताच मिस कॉल देऊन अर्थातच पूर्व सूचना देऊन येत नाही. अशा परिस्थितीत, आपण आपल्या मुलांसाठी एक इच्छापत्र करणे आवश्यक आहे. मुलाचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पालक मरण पावल्यास, मुलाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी मृत्यूपत्र उपयुक्त ठरत आहे.

मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मृत्युपत्राचा वारसा मिळण्याचा अधिकार कोणालाही नाही, परंतु मूल १८ वर्षांचे झाल्यावर त्याला मालमत्तेवर हक्क मिळतो. मृत्युपत्र करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आता आपण मृत्युपत्र बनवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत.

तुम्ही मृत्यूपत्रात नाव, वडिलांचे/पतीचे नाव, घराचा पत्ता, जन्मतारीख यासारखी माहिती द्यावी. यामध्ये कोणतीही चूक असता कामा नये.

तुम्ही मृत्युपत्र कोणत्या तारखेला लिहिले आहे याची माहिती द्यावी.

तुम्ही तुमची इच्छा स्पष्टपणे लिहावी, त्यात हे इच्छापत्र तुमच्या इच्छेनुसार आहे, कोणत्याही प्रकारचे दडपण नाही असे लिहावे.

त्यामध्ये तुम्ही तुमच्या मालमत्तेचा योग्य तपशील द्यावा, त्यासोबत त्या मालमत्तेचे अधिकार कोणाला देत आहात याचीही माहिती द्यावी.

मृत्युपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तुम्हाला साक्षीदार मिळणे आवश्यक आहे आणि मृत्युपत्राची प्रत सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

तुम्ही तुमची इच्छा कितीही वेळा बदलू शकता आणि तुम्हाला कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. तुम्हाला इच्छापत्र कोणत्याही भाषेत लिहून मिळू शकते.

Leave a Comment