FD करायचा प्लॅन आहे ना ? मग 2 वर्षाच्या एफडी करिता सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डी बाय डे वाढतच आहे. जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट अर्थातच एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण फिक्स डिपॉझिटमध्ये 2 वर्षांच्या कालावधीसाठी देशातील कोणत्या बँका सर्वाधिक व्याजदर देत आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

FD ठरतेय फायदेशीर

मुदत ठेव योजना अलीकडे गुंतवणूकदारांची पहिली पसंत बनली आहे. याचे कारण म्हणजे आरबीआयचे धोरण आणि बँकांनी मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात केलेली वाढ. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कमी राहिली आहे.

त्याचा परिणाम म्हणून आता बँकांच्या माध्यमातून मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. याचसाठी बँकांच्या माध्यमातून एवढी च्या व्याजदरात वाढ देखील केली जात आहे.

प्रामुख्याने अल्पकालावधीच्या एफडी योजनांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढवले जात आहे. याचा परिणाम म्हणून FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे.

2 वर्षाच्या एफडी साठी कोणत्या बँका देतात सर्वाधिक व्याज

आरबीएल बँक : या बँकेकडून आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेत आकर्षित करण्यासाठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. बँकेकडून दोन वर्षांच्या एफडी साठी आठ टक्क्याचे व्याज दिले जात आहे. यामुळे जर तुम्ही या बँकेत गुंतवणूक केली तर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकणार आहे.

IDFC फर्स्ट बँक : ही देखील बँक आपल्या ग्राहकांना एफडी मधून चांगला परतावा मिळावा म्हणून बंपर व्याजदर ऑफर करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बँकेकडून दोन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडी करिता 7.75 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

DCB बँक : या बँकेकडून दोन वर्षांच्या कालावधीकरिता केल्या जाणाऱ्या FD साठी 7.55% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

Indusind बँक : जर तुम्हालाही दोन वर्षांची एफडी करायची असेल तर इंडसइंड बँकेचा पर्याय देखील तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. कारण की बँकेकडून दोन वर्षांच्या एफडी साठी 7.50% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.

Yes बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही एक प्रसिद्ध बँक आहे. या बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षांच्या एफडी करीता 7.25 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे. यामुळे एफ डी मध्ये गुंतवणुकीसाठी एस बँकेचा पर्याय देखील फायदेशीर राहणार आहे.

Leave a Comment