देशातील कोणत्या बँका FD वर देताय सर्वाधिक व्याज ? पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन गुंतवणूकदारांकडे आहेत. मात्र अनेकजण आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीमध्ये बँकेची FD योजना विशेष लोकप्रिय आहे. एका अहवालानुसार, आता भारतीय महिला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी एफडी करण्याकडे अधिक आकृष्ट होत आहेत.

खरंतर एफडी ही सुरक्षित गुंतवणूक आहे. शिवाय अलीकडे एफडीसाठी चांगले व्याजही मिळत आहे. अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे.

दरम्यान आज आपण देशातील अशा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिकच्या नागरिकांना सर्वाधिक व्याज देत आहेत.

या बँका FD वर देताय अधिक व्याज

ॲक्सिस बँक : Axis Bank ही प्रायव्हेट सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना FD साठी चांगले व्याज ऑफर केले जात आहे. ही बँक सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना FD वर अधिकचे व्याजदर ऑफर करते.

मिळालेल्या माहितीनुसार बँकेकडून तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर दिले जात आहे. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.25 लाख रुपये होणार आहे.

बँक ऑफ बडोदा : ही पब्लिक सेक्टरमधील म्हणजेच सर्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. या बँकेत देना बँकेचा मर्जर झाल्यानंतर बँकेची ग्राहक संख्या वाढली आहे.

बँक ऑफ बडोदा ही बँक तीन वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. म्हणजे या बँकेत जर एखाद्या ज्येष्ठ गुंतवणूकदाराने आता 1 लाख रुपयांची रक्कम FD केली तर तीन वर्षांत त्याला 1.26 लाख रुपये मिळतील.

एचडीएफसी बँक : HDFC बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधील भारतातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC, ICICI आणि पंजाब नॅशनल बँक या तिन्ही बँका तीन वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर ऑफर करत आहेत. म्हणजेच या तिन्ही बँकांमध्ये आता जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख रुपये गुंतवले तर त्याला तीन वर्षांनी 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. 

स्टेट बँक ऑफ इंडिया : भारतातील पब्लिक सेक्टर मधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.

म्हणजे या बँकेत आता एखाद्या 60 वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवलेत तर त्याला तीन वर्षांनी एक लाख 24 हजार मिळणार आहेत.

Leave a Comment