Bank News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील काही बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत.
यामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. चार डिसेंबरला RBI ने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी स्थित शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.
अर्थातच आता या बँकेला बँकिंग सेवा देता येणार नाहीत. या बँकेत आता ग्राहकांना पैसे ठेवता येणार नाहीत आणि बँकेला कोणत्याही प्रकारचे कर्जाचे वितरण करता येणार नाहीये.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही बँक आता बंद करण्यात आली आहे.राज्यातील या सहकारी बँकेसह गुजरात आणि बिहार राज्यांमधील सहकारी बँकांवर देखील आरबीआयने कठोर ॲक्शन घेतली आहे.
आरबीआयने बिहार आणि गुजरात मधील पाच सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. बिहारच्या पाटलीपुत्रा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला १.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पाटण नागरीक सहकारी बँक लिमिटेड, गुजरात या को-ऑपरेटिव बँकेला 1.50 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. गुजरातमधील मंडल नागरीक सहकारी बँक लिमिटेडला सुद्धा ₹1.50 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
RBI ने बालासोर भद्रक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला देखील ₹50,000 चा आर्थिक दंड ठोठावला आहे. तसेच आरबीआयने ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला देखील ₹1 लाखाचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
मात्र या पाच सहकारी बँकांवर झालेल्या या दंडात्मक कारवाईचा बँक ग्राहकांना कोणताच विपरीत परिणाम सहन करावा लागणार नाही.
बँक ग्राहकांवर यामुळे कोणताही परिणाम होणार नसल्याने ग्राहकांनी चिंता करू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून आरबीआय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर सक्त झाली आहे.
आरबीआयच्या माध्यमातून आता बँकांवर कठोर कारवाई केली जात आहे. तथापि, या दंडात्मक कारवाईमुळे बँक ग्राहकांचे कोणतेच नुकसान होणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.