Bank Of Badoda FD Rate : बँक ऑफ बडोदा ही भारतातील एक मोठी सरकारी बँक आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. याशिवाय या देशातील बड्या सरकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरदेखील चांगले व्याज दिले जात आहे.
दरम्यान बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाने आपल्या एफडी व्याजदरात पुन्हा एकदा बदल केले आहेत. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे.
खरे तर बँक ऑफ बडोदाने दोन कोटी रुपयांपासून ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या FD व्याजदरात बदल केले आहे. बल्क एफडी व्याजदरात करण्यात आलेले हे बदल 18 मे 2024 पासून लागू झालेले आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण बँक ऑफ बडोदाचे FD चे सुधारित व्याजदर कसे आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँक ऑफ बडोदाचे बल्क एफडी चे व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही सारखेच राहतात.
बँक ऑफ बडोदाचे बल्क एफडीचे सुधारित व्याजदर खालील प्रमाणे
7 दिवसांपासून ते 45 दिवस कालावधीच्या एफडीवर बी ओ बी बँकेच्या माध्यमातून 5 % एवढे व्याज दिले जात आहे.
46 दिवस ते 180 दिवसं कालावधीच्या एफडीवर बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 5.75 टक्के व्याज देत आहे.
181 दिवस ते 210 दिवस कालावधीच्या एफडीवर बँक ऑफ बडोदा 6.50% व्याज देत आहे.
211 दिवस ते 364 दिवस कालावधीच्या एफडीवर बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 6.75 % दरात व्याज देत आहे.
365 दिवस म्हणजेच एका वर्षाच्या एफडीवर BOB 7.60 % दराने व्याज देत आहे.
366 दिवस ते चारशे दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर बँकेच्या माध्यमातून 6.85% दराने व्याज दिले जात आहे.
दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर बँकेच्या माध्यमातून 6.50% दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांपेक्षा जास्त 5 वर्षापर्यंतच्या FD वर बँक 6% दराने व्याज देत आहे.
पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्ष कालावधीपर्यंतच्या एफडीवर पाच टक्के इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.