मान्सूनच्या आधी महाराष्ट्रावर घोंगावतंय चक्रीवादळाच संकट ! ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याने दिला अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Cyclone Alert : महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात असे नुकसान झाले असून यामुळे आगामी खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्व मशागत करत असलेल्या शेतकऱ्यांचे काम देखील रखडत आहे. या वादळी पावसाने शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले आहे.

दरम्यान, या वादळी पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज समोर आला आहे. खरंतर सध्या सर्वत्र मान्सूनच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

भारतीय हवामान खात्याने 19 मे ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी सध्या अनुकूल परिस्थिती असून आगामी काही दिवसात मान्सून केरळात येणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जर सध्या जशी अनुकूल परिस्थिती आहे तशीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहिली तर 31 मेला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते.

या जाहीर झालेल्या तारखेत दोन-तीन दिवस मागे पुढे होऊ शकतात. तथापि 28 मे ते 3 जून या कालावधी दरम्यान मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.

अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याची माहिती दिली आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, हे कमी दाबाचे क्षेत्र अति कमी दाबाच्या क्षेत्रात परावर्तित होणार आहे.

परिणामी चक्रीवादळाची निर्मीती होईल अशी शक्यता आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज तज्ञांनी दिला आहे.

याच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होण्याची शक्यता आहे.

किनारपट्टी प्रदेशात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रावर देखील या वादळाचा प्रभाव पाहायला मिळू शकतो. येत्या दोन-तीन दिवसांत या वादळाचा काही प्रमाणात तडाखा राज्याला देखील बसणार अशी शक्यता आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment