मुंबईकरांना मिळणार नवीन एक्सप्रेस वे ची भेट ! 11 तासांचा प्रवास होणार फक्त 6 तासात, ‘ही’ शहरे जोडली जाणार, कसा राहणार नवीन मार्ग ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai New Expressway : महाराष्ट्रासहित भारतात गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबुतीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रामुख्याने रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांवर शासनाचे विशेष लक्ष आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात अनेक महामार्गाची कामे मार्गी लागली आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही नवीन महामार्ग तयार होणार आहेत. अशातच मुंबई आणि मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळ समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्प अंतर्गत जालना ते नांदेड दरम्यान नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.

हा महामार्ग 180 किलोमीटर लांबीचा राहणार असून यामुळे मुंबई ते नांदेड हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण करता येईल अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरंतर समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा हा वाहतुकीसाठी सुरू असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट 2024 तारखेपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

अशा परिस्थितीत आता समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जालना ते नांदेड दरम्यान विकसित होत असलेल्या 180 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या.

दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर झालेल्या आर्थिक निविदा आता खुल्या झाल्या आहेत. यात चार स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर निविदेची पडताळणी पूर्ण करून येत्या महिन्याभरात आता या कंपन्यांना या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कंत्राटदार म्हणून नियुक्त केले जाणार आहे. याचाचं अर्थ या महत्वकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

हा महामार्ग जालना, परभणी व नांदेड या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना कनेक्ट करणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा नांदेड ते मुंबई हा प्रवास सहा तासात पूर्ण होणार आहे. सध्या नांदेड ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी 11 तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे.

अर्थातच हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या प्रवासातील प्रवाशांचे बहुमूल्य असे पाच तास वाचणार आहेत. या महामार्ग प्रकल्पामुळे मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे.

हा सहा पदरी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील नागरिकांना जलद गतीने मुंबईत पोहोचता येणार आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी देखील आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होणार आहे.

Leave a Comment