बँक ऑफ बडोदाच्या 399 दिवसांच्या नवीन एफडी योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार? वाचा संपूर्ण गणित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना इत्यादी ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली जात आहे.

याशिवाय सोने, चांदी, रियल इस्टेट अशाही अनेक ठिकाणी पैसे गुंतवले जात आहेत. तसेच काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत.

मात्र येथील गुंतवणूक थोडीशी रिस्की असते. मात्र बँकेतील एफडी मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. अशा परिस्थितीत जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, आज आपण बँक ऑफ बडोदाने नव्याने जाहीर केलेल्या 399 दिवसांच्या एफडी योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ बडोदा किती व्याज देते ?

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 399 दिवसांच्या एफडीसाठी 7.15% व्याज दिले जात आहे. बँक ऑफ बडोदाने जाहीर केलेली ही सर्वाधिक व्याज देणारी FD योजना असल्याचा दावा बँकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

जर तुम्ही या एफडी योजनेत दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर अर्थातच 399 दिवसांनी दोन लाख 15 हजार 683 रुपयांची रक्कम मिळणार आहे.

याचाच अर्थ 15,683 रुपये या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला व्याज म्हणून मिळणार आहे. या योजनेची विशेष बाब अशी की, बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याज दिले जात आहे.

म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी बँक ऑफ बडोदा मध्ये 399 दिवसांसाठी एफडी केली तर त्यांना 7.65% एवढे व्याज मिळणार आहे.

म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेमधून या ठिकाणी चांगला परतावा मिळू शकणार आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची ही नव्याने जाहीर झालेली एफडी योजना फायदेशीर ठरेल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे. 

Leave a Comment