बँक ऑफ बडोदाची ‘ही’ FD योजना गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न ! मिळणार लाखोंचे व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of Baroda FD Scheme : बँक ऑफ बडोदा ही देशातील पब्लिक सेक्टरमधील एक महत्वाची बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एफडी योजना ऑफर करते. बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीपर्यंतची एफडी ऑफर करत आहे.

दरम्यान, आज आपण बँकेच्या एका विशेष एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र असे असले तरी अनेकजण आजही एफडीमध्येच गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

याचे कारण म्हणजे एफडीमध्ये गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित राहण्याची हमी असते. बँका सहसा दिवाळखोरीत जात नाहीत. जर दिवाळखोरीत गेली तरीदेखील गुंतवलेल्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर हमी असते.

म्हणजे बँक बुडाली तर ग्राहकांना पाच लाख रुपयांपर्यंतची त्यांची रक्कम परत मिळते. या शिवाय अलीकडे बँकांच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. हेच कारण आहे की अनेक तज्ञ लोक सध्याचा काळ हा एफडी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा करतात.

यामुळे अलीकडे महिलांनी देखील सोन्यात किंवा चांदीत गुंतवणूक करण्याऐवजी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवले आहे.

दरम्यान जर तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या 1111 दिवसांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बँक ऑफ बडोदाची 1111 दिवसांची एफडी योजना

भारतात एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टर बँक आहे. यात बँक ऑफ बडोदा या पीएसबीचा देखील समावेश होतो. दरम्यान ही पीएसबी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1111 दिवसांची एफडी योजना राबवत आहे.

मात्र ही बँकेची एक विशेष FD योजना असून याला ग्रीन एफडी योजना म्हणून ओळखली जात आहे. या योजनेमध्ये जे ग्राहक पैसे गुंतवतील तो पैसा पर्यावरणाच्या कामी येणार आहे. त्यामुळे इतर एफडी योजनेच्या तुलनेत यातील परतावा हा थोडासा कमी पाहायला मिळतो.

हाती आलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाच्या या 1111 दिवसाच्या ग्रीन एफ डी योजनेत 6.4 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे. अर्थातच जर या एफडी योजनेत एखाद्याने आता 5 लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच 1111 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 6 लाख 3 हजार रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेत पाच लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 1111 दिवसांनी एक लाख तीन हजार रुपयांचे व्याज मिळू शकणार आहे.

Leave a Comment