Bank Of Boroda FD Scheme : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची राहणार आहे.
कारण की, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या अशा एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.
खरंतर, अलीकडे बँक ऑफ बडोदा सहित अनेक बँकांनी एफडी व्याज दरात वाढ केली आहे. अनेक बँकांनी विविध एफडी योजना ग्राहकांसाठी लॉन्च केल्या आहेत.
बी ओ बी अर्थातच बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या ग्राहकांना एफडी साठी आकर्षित करणे हेतू एक नवीन योजना सुरू केली आहे.
बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम नावाची एक नवीन एफडी योजना लाँच केली आहे. दरम्यान आता आपण या तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम योजना
बँक ऑफ बडोदाने अलीकडेच सुरू केलेली ही एक अधिक परतावा देणारी एफडी योजना आहे. ही योजना 399 दिवसात परिपक्व होत असते.
या बँकेच्या अलीकडे घोषित करण्यात आलेल्या FD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ७.१५ टक्के एवढे व्याज दिले जात आहे. विशेष बाब अशी की या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याज दिले जात आहे.
अर्थातच बँक ऑफ बडोदाच्या तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.65% एवढे व्याज दिले जाणार आहे.
4 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
या एफडी योजनेत जर एखाद्याने तीन लाख 99 हजार 999 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर चार लाख 23 हजार 277 रुपये मिळणार आहेत.
जर ज्येष्ठ नागरिकांनी या FD योजनेत तीन लाख 99 हजार 999 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर चार लाख 34 हजार 608 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.