ब्रेकिंग ! मोदी सरकारची महिलांना खास भेट, घरगुती गॅस सिलेंडर झाले ‘इतके’ स्वस्त, जागतिक महिला दिनाची महिलांना भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Price Decrease : आज आठ मार्च, जागतिक महिला दिन. दरम्यान, आजच्या या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आज घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचे जाहीर केले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.

भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभेच्या तारखा जाहीर करेल असा अंदाज आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आचारसंहिता सुरू होण्याआधीच केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे.

काल केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी सहा महत्त्वाचे निर्णय घेतले होते. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचारी शेतकरी महिला इत्यादी वर्गांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत.

दरम्यान, आज महिला दिनाचे औचित्य साधून आणि आगामी निवडणुकीत महिलांना साधण्याचा प्रयत्न म्हणून केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हणजे X वर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. यानुसार, आता आपण गॅस सिलेंडरच्या सुधारित किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसे राहतील सुधारित दर ?

मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपयाला मिळेल. तसेच कोलकत्ता मध्ये 829 रुपयांना, आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबईमध्ये 802.50 रुपयांना, चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर आता उपलब्ध होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च महिन्यात केंद्र सरकारने एकाच वेळी गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्राने गॅस सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. म्हणजे आता महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या किंमती 800 रुपयांच्या आसपास राहणार आहेत. 

पंतप्रधान उज्वला योजनेला मिळाली मुदतवाढ

विशेष बाब अशी की, काल केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत उज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सबसिडीला एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

मोदी सरकारच्या माध्यमातून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर साठी 300 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. दरम्यान या सबसिडी योजनेला आता 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त 503 रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. 

Leave a Comment