मोठी बातमी ! ‘या’ बँकेने होम लोन अन पर्सनल लोनच्या व्याजदरात केली मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of India Interest Rate : भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. पब्लिक सेक्टर बँक अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश होतो. ही देशातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून या बँकेचे करोडो कस्टमर आहेत.

दरम्यान, याच बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बँक ऑफ इंडियाच्या MCLR बाबत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सदर सरकारी बँकेने MCLR दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे साहजिकच या बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

बँकेने घेतलेल्या या नवीन निर्णयांमुळे आता बँकेकडून दिले जाणारे होम लोन, पर्सनल लोन यांसारखे सर्व प्रकारचे कर्ज महाग होणार आहे.

अर्थातच आता बँकेकडून दिला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे या बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदार व्यक्तींचा ईएमआय आता वाढणार आहे.

यामुळे महागाईने आधीच बेजार झालेल्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँक ऑफ इंडिया बँकेने MCLR दरात 0.05% एवढी वाढ केली आहे.

बँकेने याबाबत एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. यात बँकेने असे सांगितले की, नवीन MCLR दर उद्यापासून अर्थातच एक मार्च 2024 पासून लागू होणार आहेत.

या देशातील बड्या सरकारी बँकेने 1 महिन्यापासून ते 3 वर्ष कालावधी मधील एमसीएलआर वाढवले आहे. सरकारी बँकेच्या या निर्णयामुळे करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसणार हे स्पष्ट आहे.

त्याच्या अंमलबजावणीनंतर, कर्जाचे दर वाढतील आणि जास्त EMI भरावे लागणार असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.

आता या बँकेचा 1 महिन्याचा MCLR दर 8.35 टक्के, 3 महिन्यांचा MCLR दर 8.45 टक्के, 6 महिन्यांचा MCLR दर 8.65 टक्के, 1 वर्षाचा MCLR दर 8.85 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR दर 9.05 टक्के एवढा राहणार आहे.

Leave a Comment