Banking FD News : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र हे जरी वास्तव असलं तरी देखील आजही सुरक्षित गुंतवणुकीला भारतात विशेष महत्त्व आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढती आहे.
विशेषता बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दिली जात आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांच्या माध्यमातून एफडी वरील व्याजदर वाढवण्यात आले आहे.
यामुळे आता देशातील महिला देखील सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी एफडी करण्याकडे विशेष आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. काही आकडेवारींमधून हे स्पष्ट देखील झाले आहे.
बँका सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा वरिष्ठ नागरिकांना एफडी साठी अधिकचे व्याजदर देत आहेत. देशातील काही बँकांकडून वरिष्ठ नागरिकांना एफडी साठी तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे.
कोणती बँक देते एफडीसाठी सर्वोच्च व्याजदर
काही मोठ्या बँकांच्या तुलनेत देशातील काही छोट्या बँका एफडीसाठी चांगले व्याजदर देत आहेत. देशात एफडी साठी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून सर्वाधिक व्याज दिले जात आहे.
ही छोटी वित्त बँक एफडीवर इतर कोणत्याही बँकेच्या तुलनेत सर्वाधिक व्याज देत आहे. बँकेने 2 फेब्रुवारीला FD चे दर बदलले आहेत.
आता ज्येष्ठ नागरिकांसाठी, या बँकेकडून 1001 दिवसांसाठीच्या एफडी करिता 09.50% एवढे व्याज दिले जात आहे. ही बँक 6 महिने आणि 201 दिवस आणि 1001 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 9.25% या दराने व्याज देत आहे.
ही बँक 501 दिवसांच्या FD वर 9.25% दराने व्याज ऑफर करत आहे. ही बँक 701-दिवसांच्या FD वर 9.45% व्याज ऑफर करत आहे.