Fast Tag Information:- फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर असून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करत असते. म्हणजेच आपण टोल नाक्यावर या यंत्रणेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने टोल टॅक्स भरू शकतो.

म्हणजेच एकंदरीत टोल भरण्यासाठी रोख पैसे न देता या फास्टटॅगचा वापर आता जास्त प्रमाणामध्ये केला जात आहे. फास्टटॅग वाहनाच्या समोरच्या काचेवर लावण्यात आलेला असतो व यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन लावलेले असते. जेव्हा आपले वाहन टोल नाक्यावर येते तेव्हा त्या टोलवर जे काही सेंन्सर असतात

Advertisement

ते आपल्या वाहनावर लावलेल्या फास्ट टॅगच्या कॉन्टॅक्टमध्ये येताच त्या ठिकाणी आवश्यक असणारा टॅक्स ऑटोमॅटिक कापला जातो व तुम्ही कुठल्याही विलंबाशिवाय टोलनाक्यावरून निघून जाऊ शकतात. हे फास्टटॅग तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत वॉलेट सोबत देखील कनेक्ट करू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला टोल भरायचा आहे अशा ठिकाणी तुमच्या अकाउंट मधून आपोआप पैसे डेबिट होतात.

 फास्टटॅग कुठून खरेदी करावा लागतो?

Advertisement

जर तुम्हाला देखील तुमच्या वाहनाकरिता फास्टटॅग खरेदी करायचा असेल तर तुम्ही तुमचे ओळखीचे कागदपत्र आणि वाहनांची नोंदणी संबंधित कागदपत्रे सादर करून काही ठराविक टोलनाक्यांवरून देखील खरेदी करू शकतात किंवा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने देखील खरेदी करू शकतात.

यामध्ये आरटीओ ऑफिस किंवा सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बँकांमध्ये देखील फास्टटॅग तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी, बँका किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी देखील फास्टटॅग विक्रीकरिता विशेष विक्री केंद्र देखील उपलब्ध आहेत.

Advertisement

बँकांचा विचार केला तर तुम्ही आयसीआयसीआय तसेच एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी आणि एचडीएफसी बँक तसेच ॲक्सिस व सिंडिकेट बँक या बँकांमधून फास्टटॅग खरेदी करू शकता व याशिवाय पेटीएम व ॲमेझॉन वरून देखील खरेदी करू शकतात.

 फास्टटॅग खरेदीसाठी कुठली कागदपत्र लागतात?

Advertisement

यामध्ये तुम्हाला गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आरसी व गाडी मालकाचा पासपोर्ट साईज फोटो व महत्वाचे म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना लागतो. तसेच ऍड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड,पॅन कार्ड किंवा वोटर आयडी देखील लागतो.

 फास्टटॅग रिचार्ज कसा करावा?

Advertisement

फास्टटॅग अकाउंट रिचार्ज करण्यासाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंगद्वारे रिचार्ज करू शकतात. हे खाते तुम्ही शंभर रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता.

तसेच पेटीएम वॉलेट, भीम यूपीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून देखील रिचार्ज  करता येऊ शकतो. एका फास्टटॅगचा व्हॅलिडीटी पिरेड पाच वर्षाचा असून कालावधीत तुमच्या फास्टटॅग खात्यामधील कोणती रक्कम आपोआप डेबिट केली जाते.

Advertisement

 तुम्हाला जर कार विकायची असेल तर तुमच्या फास्टटॅगच काय करायचं?

तुम्ही जर वाहन विकले असेल आणि त्या वाहनाचे कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केले असेल तर त्याकरिता तुमच्या जुना फास्टटॅग बंद करणे गरजेचे आहे. नाहीतर ती दुसरी व्यक्ती तुमच्या या फास्टटॅगचा फायदा घेऊ शकते व पेमेंट करू शकते.

Advertisement

दुसरे म्हणजे तुमचे फास्टटॅग खाते जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या नवीन व्यक्तीला गाडी विकली आहे तो त्याच्या नावाने फास्टटॅग खात्यासाठी नोंदणी करू शकत नाही. जर तुम्ही तुमचे वाहन किंवा कार विकली तर तुमच्या कारच्या विक्री बाबतची माहिती तुमच्या कारसाठी ज्या बँकेने फास्टटॅग जारी करणारे बँकेला देणे गरजेचे आहे व खाते बंद करावे.

 अशा पद्धतीने निष्क्रिय करा तुमचा फास्टटॅग

Advertisement

जर तुम्हाला तुमचा फास्टटॅग निष्क्रिय करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणाहून फास्टटॅग जारी करण्यात आलेला आहे त्यांच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधने गरजेचे आहे व या माध्यमातून तुम्ही तुमच्या फास्ट टॅगशी लिंक केलेले खाते बंद किंवा निष्क्रिय करण्याची विनंती करू शकतात.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 1033 बाहेर टोल फ्री क्रमांक  जारी करण्यात आलेला असून यावर देखील कॉल करून तुम्ही तुमचे फास्टटॅग बंद करण्याची तक्रार नोंदवू शकतात. तसेच यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे काही वेगवेगळे नंबर देखील आहेत व त्यावर कॉल करून देखील तुम्ही तुमचे फास्टटॅग निष्क्रिय करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर…

Advertisement

एचडीएफसी बँकेचे युजर्स  18001201243 वर संपर्क साधू शकतात.

ॲक्सिस बँकेचे युजर्स फास्टटॅग खाते निष्क्रिय करण्यासाठी 18004198585 या नंबरवर कॉल करू शकता.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *