आपल्यापैकी बरेच जण मोठ्या शहरांमध्ये राहतात व पुणे किंवा मुंबई तसेच कुठलेही मोठे शहर राहिले तरी आपल्याला वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावेच लागते. बऱ्याचदा जेव्हा आपण कामानिमित्त घराबाहेर निघतो तेव्हा वाहतूक कोंडीच्या समस्यांनी आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर त्रास होतो की आपण हव्या त्या वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचणे कठीण जाते.

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तर ही समस्या दररोज प्रत्येकाला येत असते. ज्या ठिकाणी अगदी काही मिनिटांचा कालावधी लागतो त्या ठिकाणी पोहोचायला वाहतूक कोंडीमुळे काही तासांचा कालावधी देखील लागू शकतो.

Advertisement

त्यामुळे तुम्हाला देखील जर या समस्येपासून मार्ग काढायचा असेल किंवा वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करायची असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून व त्यांचा वापर करून तुम्ही वाहतूक कोंडीची समस्या टाळू शकतात. यासाठी काही टिप्स वापरल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

 या गोष्टींचा वापर करा आणि वाहतूक कोंडीची समस्या टाळा

Advertisement

1- तुमच्या शहरातील वाहतूक कोंडी बद्दल न्यूज पाहून अपडेट राहणे आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा वाहतूक कोंडी जर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असेल तर त्या संबंधीच्या बातम्या काही चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवर दिल्या जातात व असे पेज जर तुम्ही फॉलो केले किंवा अकाउंट फॉलो केले तर घराच्या बाहेर निघण्या अगोदर तुम्हाला या संबंधीची माहिती मिळू शकते.

तसेच एखादी दुर्घटना घडली असेल व काही विशेष कामांमुळे ट्रॅफिक जाम असेल तर तुम्हाला याची माहिती मिळते व तुम्ही पर्यायी रस्त्यांचा वापर करू शकतात. अशा परिस्थितीत ट्रॅफिक जाम ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणाहून पर्याय रस्ते कोणते आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळते व तुम्ही त्यांचा वापर करून तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतात.

Advertisement

2- एकापेक्षा जास्त रस्त्यांची माहिती ठेवणे तुम्हाला एखाद्या ठिकाणी अगदी वेळेमध्ये जायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचायचे इतर पर्यायी मार्गांची माहिती मिळवणे गरजेचे आहे.

तुम्ही मुख्य मार्गाने जात असता पुढे जर ट्रॅफिक लागेल अशी शक्यता तुम्हाला वाटली तर तुम्ही या पर्यायी मार्गांचा वापर करून तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या ठिकाणी आरामात जाऊ शकतात. त्यामध्ये तुमच्या हातातील मोबाईल मध्ये असणारे मॅप्स देखील तुम्हाला मदत करू शकतात.

Advertisement

3- गर्दीच्या वेळेमध्ये बाहेर पडणे शक्यतो टाळावे तुम्हाला जर ऑफिस साठी किंवा काही कामासाठी दररोज बाहेर जायचे असेल तर ट्रॅफिकचा विचार करून किंवा ट्रॅफिक कोणत्या वेळेत जास्त असते त्या वेळेचा विचार करूनच तुम्ही घराच्या बाहेर निघण्याचे प्लॅनिंग करावे.

म्हणजे जर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे व त्या परिसरामध्ये जर आठ ते नऊ या वेळेमध्ये ट्रॅफिक जाम होत असेल तर तुम्ही आठ वाजायच्या अगोदरच घरातून निघणे फायदेशीर ठरते.

Advertisement

4- ट्रॅफिक एप्लीकेशनचा वापर करणे सध्या तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेले असल्यामुळे तंत्रज्ञानामुळे अशी अनेक एप्लीकेशन आहेत की त्यामुळे तुम्हाला लाईव्ह ट्रॅफिकची माहिती मिळते. यामध्ये तुम्ही लाईव्ह ट्रॅफिक मॉनिटर सारखे ॲप्लिकेशन मध्ये कॅमेराची मदत घेऊन ठराविक ठिकाणाच्या वाहतूक कोंडीबद्दल बिनचूक माहिती मिळवू शकतात.

5- गरज नसेल तर स्वतःचे वाहन वापरणे टाळावे ज्या ठिकाणी तुम्हाला सहज चालत जाता येणे शक्य आहे अशा ठिकाणी तुम्ही स्वतःचे वाहन न वापरता जाण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्यापैकी बरेच जण ज्या ठिकाणी चालत जाता येणे शक्य आहे अशा ठिकाणी देखील वाहन नेतात.

Advertisement

त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या तर येतेच परंतु कधीकधी गाडी पार्किंग करण्यासाठी देखील जागा मिळत नसल्याने खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला पायी चालत जाता येणे शक्य आहे किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता येणे शक्य आहे अशा ठिकाणी स्वतःचे वाहन न वापरलेले बरे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *