Banking FD Scheme : अलीकडे भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. थोडासा परतावा कमी मिळाला तरी चालेल मात्र कष्टाने कमावलेला पैसा लॉस मध्ये जाणार नाही याची काळजी गुंतवणूकदारांकडून घेतली जाते.
यामुळे बँकेची एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
पूर्वी भारतात महिला सोन्यात गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवत. आता मात्र महिला गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत आहेत.
विशेष बाब म्हणजे अलीकडे गुंतवणूकदारांना एफडी मधून चांगला परतावा देखील मिळू लागला आहे. तथापि जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण एफडी वेळेपूर्वी ब्रेक केली तर गुंतवणूकदारांना किती नुकसान होते आणि या नुकसानीपासून वाचायचे असल्यास गुंतवणूकदाराने काय केले पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
FD वेळेआधी तोडल्यास काय होणार ?
जसं की आपणास ठाऊकच आहे की एफडीमध्येच तोडली तर बँकेच्या माध्यमातून पेनल्टी लावली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही मुदतीपूर्वी एफडी तोडली तर तुम्हाला त्यावर व्याज मिळणार नाही जे तुम्हाला एफडी सुरू करताना सांगितले होते.
एफडी वेळेआधी तोडली तर वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळी पेनल्टी आकारली जाऊ शकते. जर आपण एसबीआय बाबत विचार केला तर या बँकेतील एफडी मुदतपूर्तीपूर्वी खंडित केल्यास यावरील व्याज 1% पर्यंत कमी होते. याशिवाय त्यावर मिळणाऱ्या व्याजावर दंडही वसूल केला जातो.
तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची एफडी मिळाल्यास, मुदतपूर्तीपूर्वी एफडी तोडल्यास तुम्हाला 0.50% दंड भरावा लागेल. तसेच 5 लाखांपेक्षा जास्त आणि 1 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी केलेली असेल आणि मुदतपूर्व FD ब्रेक केली तर 1% दंड भरावा लागणार आहे.
नुकसानी पासून कसे वाचणार
जाणकार लोक सांगतात की, एफडी वेळेआधी ब्रेक केल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते. यामुळे गुंतवणूकदाराने कमी कालावधीची एफडी केली पाहिजे. शिवाय एकाच एफडी योजनेत सर्व पैसे न गुंतवता, वेगवेगळ्या FD योजनेत छोटी-छोटी अमाऊंट गुंतवली पाहिजे.
जेणेकरून तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुमचे अधिकचे नुकसान होणार नाही. छोट्या अमाऊंटची एक-दोन एफडी तोडून तुम्ही पैसे उपलब्ध करू शकता. किंवा मग एफडी ब्रेक करण्याऐवजी तुम्ही एफडी वर लोन घेऊ शकता.