एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी; गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज महागल; किती वाढणार व्याजदर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील 12 पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेपैकी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. दरम्यान एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे कोट्यावधी कस्टमर आहेत.

दरम्यान एचडीएफसी बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता एचडीएफसी बँकेतील ग्राहकांचे गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाचे EMI वाढणार आहेत. शिवाय जे ग्राहक नव्याने कर्ज घेतील त्यांना देखील आता वाढीव व्याजदरात कर्ज मिळणार आहे.

त्यामुळे महागाईने होरपळलेल्या HDFC बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेने एमएलसीआर रेट वाढवले आहेत.

याचा परिणाम म्हणून बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बँकेने एमएलसीआर रेट मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे.

ही वाढ आगामी काही दिवसासाठी लागू राहणार आहे. दरम्यान या वाढीव दराची अंमलबजावणी आजपासून अर्थातच 8 फेब्रुवारी 2024 पासूनच होणार आहे.

यामुळे आता एचडीएफसी बँकेने एमएलसीआर रेटमध्ये नेमकी किती वाढ केली आहे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC बँकेचे सुधारित एमएलसीआर रेट खालीलप्रमाणे

बँकेचा ओवरनाईट एमएलसीआर रेट : 8.90%

एका महिन्याचा एमएलसीआर : ८.९० टक्के 

तीन महिन्यांचा एमएलसीआर : ९.१०

सहा महिन्यांचा एमएलसीआर : ९.३० टक्के 

एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा एमएलसीआर : ९.३० टक्के

२ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठीचा एमएलसीआर : ९.३५ टक्के

३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठीचा एमएलसीआर : ९.३५ टक्के

Leave a Comment