Banking News : एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील तथा प्रायव्हेट सेक्टरमधील बँकांनी आपल्या ग्राहकांना खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक केलेले आहे. मात्र अनेकांना याबाबत माहिती नसते.
यामुळे अनेकजण आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवत नसल्याचे आढळले आहे. मात्र जर बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम मेंटेन केली गेली नाही तर बँकेच्या माध्यमातून मोठा दंड आकारला जातो. यामुळे सर्वसामान्यांना नाहक भ्रूदंड सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यात किती किमान शिल्लक रक्कम मेंटेन करावी लागते याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
आयसीआयसीआय बँक : ही बँक प्रायव्हेट सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. या बँकेच्या मोठ्या शहरातील ब्रांच मधील ग्राहकांना दहा हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते.
तसेच छोट्या शहरांमधील ग्राहकांना किमान पाच हजार रुपये आणि रुरल भागातील ग्राहकांना दोन हजार रुपये एवढी किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते.
HDFC बँक : एचडीएफसी बँक ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे कोट्यावधी ग्राहक आहेत. एचडीएफसी बँकेच्या शहरी भागातील बचत खाते ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम म्हणून दहा हजार रुपये खात्यात ठेवावे लागतात.
दुसरीकडे लहान शहरांमधील ग्राहकांना पाच हजार रुपये आणि रुरल एरिया मधील ग्राहकांना अडीच हजार रुपये किमान शिल्लक रक्कम म्हणून बचत खात्यात ठेवावे लागतात.
पंजाब नॅशनल बँक : ही बँक पब्लिक सेक्टर मधील एक प्रमुख बँक आहे. जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेच्या शहरी भागातील ब्रांच मध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला तुमच्या बचत खात्यात दोन हजार रुपये आणि रुरल एरिया मध्ये अकाउंट असेल तर एक हजार रुपये किमान शिल्लक रक्कम मेंटेन करावी लागणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय ही पब्लिक सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. जर तुमचे एसबीआयच्या मेट्रो शहरांमधील ब्रांच मध्ये खाते असेल तर तुम्हाला तुमच्या बचत खात्यात किमान तीन हजार रुपये ठेवावे लागतील.
जर छोट्या शहरातील ब्रांच मध्ये खाते असेल तर बचत खात्यात दोन हजार रुपये ठेवावे लागतील. तसेच ग्रामीण भागात जर ब्रांच असेल तर अशा ब्रांचमधील बचत खात्यात एक हजार रुपये एवढी किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते.