एकाच बँकेत 2 किंवा त्यापेक्षा अधिक बँक अकाउंट असतील अन बँक बुडाली तर किती पैसे परत मिळणार ? नियम काय सांगतो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : आपल्यापैकी अनेकांचे बँकेत एकापेक्षा अधिक अकाउंट असतील. जर तुमचेही बँकेत एकापेक्षा जास्तीचे अकाउंट असतील तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. देशातील अगदी तळागाळातील लोक देखील आता बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत.

खेड्यापाड्यात राहणारे लोक देखील आता बँकेसोबत जोडले गेले आहेत आणि यामुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे झाले आहेत. आता यूपीआयमुळे केवळ एका क्लिकवर पैशांचे व्यवहार होत आहेत. यामुळे घरात कॅश ठेवण्याऐवजी प्रत्येकजण बँकेत पैसे ठेवत आहेत.

काही पैसे बचत खात्यात ठेवले जातात. तर काही पैसे बँकेच्या एफडी, आरडी किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवले जातात. खरे तर बँकेतील पैसे हे पूर्णपणे सुरक्षित असतात. मात्र जर बँक दिवाळखोरीत निघाली तर अशावेळी ठेवेदारांना सर्वच पैसे मिळत नाहीत.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत बँकेत ठेवलेल्या ठेवीवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. DICGC ही रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची कंपनी आहे आणि याच कंपनीच्या माध्यमातून बँकेतील ग्राहकांना विमा संरक्षण मिळते.

पण, अनेकांच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीचे एकाच बँकेच्या विविध शाखांमध्ये एकापेक्षा अधिकचे बँक अकाउंट असेल आणि ती बँक जर दिवाळखोरीत निघाली तर अशावेळी त्या ग्राहकाला किती पैसे मिळतील ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नियम काय सांगतात ?

जर समजा तुम्ही तुमच्या नावाने एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाती उघडली असतील, तर अशी सर्व खाती एकच मानली जातील. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे एकाच बँकेतील वेगवेगळ्या शाखांमध्ये एकापेक्षा अधिकचे अकाउंट असतील आणि जर ही बँक बुडाली तर त्या सदर ठेवीदाराची या सर्व खात्यांमधील रक्कम जोडली जाईल, यात व्याज देखील जोडले जाईल आणि ती रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ती रक्कम त्या सदर व्यक्तीला परत केली जाईल.

जर जमा केलेली रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला फक्त 5 लाख रुपये दिले जातील. बँक दिवाळखोरीत निघाली तर सदर बँकेच्या ठेवीदारांची विविध शाखांमधील बचत खात्यातील, एफडी, आरडी किंवा इतर कोणत्याही योजनेत जमा केलेली रक्कम, त्यावरील व्याज अशा सर्व ठेवी एकत्रित जोडल्या जातील आणि ही एकत्रित रक्कम पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला सर्व रक्कम परत मिळेल. परंतु जर रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फक्त पाच लाख रुपये मिळतील.

Leave a Comment