Banking News : येत्या पाच दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे मात्र ज्या लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बँकेत काही महत्त्वाचे काम असेल त्यांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
कारण की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 16 दिवस बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी 2024 मध्ये तब्बल 16 दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत.
त्यामुळे ज्या लोकांना बँकेत जानेवारी महिन्यामध्ये काही महत्त्वाची कामे करायची असतील त्यांनी लवकरात लवकर बँकेची कामे करून घेणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जानेवारी महिन्यात कोणत्या तारखांना बँकेला सुट्टी राहू शकते याबाबत आरबीआयने दिलेल्या माहिती बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्या लोकांना जानेवारीमध्ये बँकेत जायचे असेल त्यांनी ही सुट्ट्यांची यादी पाहूनच आपल्या बँकिंग कामाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, ज्या दिवशी बँका बंद असतील त्या दिवशी इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय च्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे.
खरे तर, जानेवारी महिन्यात 16 दिवसांसाठी बँका बंद असतील. पण सर्वत्र 16 दिवसांसाठी बँक बंद राहणार नाहीत. कारण की काही सण हे काही राज्यापुरतेच मर्यादित असतात. अशा परिस्थितीत त्या सणाच्या दिवशी त्या संबंधित राज्यांमध्येच बँकेला सुट्टी राहणार आहे.
जानेवारी महिन्यात कोणत्या तारखांना राहणार बँका बंद
1 जानेवारी : देशातील अनेक राज्यांमध्ये बँक बंद राहणार आहे.
2 जानेवारी : या दिवशी देखील अनेक राज्यांमधील बँका बंद राहतील.
7 जानेवारी : रविवार असल्याने या दिवशी बँक बंद राहणार आहे.
11 जानेवारी : या दिवशी मिझोरम मध्ये बँका बंद राहतील. या तारखेला मिशनरी दिवस साजरा होत असल्याने बँका बंद राहणार आहेत.
13 जानेवारी : या दिवशी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँकेला सुट्टी राहणार आहे.
14 जानेवारी : रविवार असल्याने बँकेला सुट्टी राहणार आहे.
15 जानेवारी : उत्तरायण पुण्यकाळ/मकर संक्रांती महोत्सव/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू निमित्त बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे बँका बंद राहणार अशी माहिती आरबीआयच्या माध्यमातून समोर आली आहे.
16 जानेवारी : तिरुवल्लुवर दिनानिमित्त चेन्नईमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी राहणार असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
17 जानेवारी : उजावर थिरुनलच्या निमित्ताने चेन्नईमध्ये बँका बंद राहणार असे आरबीआयने सांगितले आहे.
21 जानेवारी : रविवार निमित्ताने या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.
22 जानेवारी : या दिवशी इमोइनू इरतपा निमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या सर्कुलर मधून ही माहिती समोर आली आहे.
23 जानेवारी : आरबीआयच्या सर्क्युलर नुसार या दिवशी इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी : या दिवशी चेन्नई कानपूर आणि लखनऊ मध्ये बँकेचे कामकाज बंद ठेवले जाणार आहे. थाई पूसम/मुहम्मद हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त या संबंधित शहरांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर होणार आहे.
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने या दिवशी देशभरातील बँकांना कुलूप राहणार आहे.
27 जानेवारी : दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत. या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर असते.
28 जानेवारी : रविवार निमित्ताने देशभरातील सर्व बँकांना या दिवशी सुट्टी राहणार आहे.