Banking News : गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामाचा आठवडा पाच दिवसांचा केला गेला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात यासंदर्भातला एक महत्त्वाचा करार झाला आहे.
बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्याबाबतचा करार पूर्ण झाला असला तरी देखील याला सरकारची मंजुरी मिळालेली नाहीये. याला सरकारची परवानगी आवश्यक असून मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच याला सरकार मंजुरी देण्याची शक्यता असेल.
बँक कर्मचाऱ्यांसाठी 2024 च्या अखेरीस याला मंजुरी दिली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर कधीही या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स सारख्या बँक कर्मचारी संघटना शनिवारच्या सुट्टीसह 5 दिवस काम करण्याचा आग्रह धरत आहेत. दरम्यान, बँकेच्या कामाचा आठवडा पाच दिवसांचा झाला तरी देखील कामाचे घंटे मात्र तेवढेच राहणार आहेत. कारण की, बँकेच्या दैनंदिन कामकाजाची वेळ वाढवली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या बँकांना दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जात आहे. दरम्यान बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी देखील सुट्टी दिली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
म्हणजे सर्व शनिवारी आणि रविवारी देखील सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी असून याबाबतचा करार नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाला असून आता या करारावर केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणारा असेल.
जर सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला तर बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा हा पाच दिवसांचा होणार आहे. असे झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, जर सरकारने 5 दिवसाच्या कामाच्या आठवड्याला मान्यता दिली तर दैनंदिन कामाचे तास 40 मिनिटांनी वाढवले जाणार आहेत.
हा निर्णय घेतला गेला तर बँका सकाळी 9.45 वाजता उघडतील अन सायंकाळी 5:30 पर्यंत सुरु राहतील. ज्याच्या दिवसाचे कामाचे तास 40 मिनिटांनी वाढणार आहेत. खरेतर, बँक युनियन 2015 पासून सर्व शनिवार आणि रविवारी सुट्टीची मागणी करत आहेत.
2015 मध्ये स्वाक्षरी केलेल्या 10 व्या द्विपक्षीय करारांतर्गत, RBI आणि सरकारने IBA सोबत सहमती दर्शवली आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे.