Banking News : अलीकडे बँक ग्राहकांची संख्या वाढली आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचेचं बँकेत खाते असेल. अनेकांचे तर एकापेक्षा अधिक अकाउंट असतील. काही लोकांचे एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन बड्या बँकांमध्ये अकाउंट असतील.
एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे तर दुसरीकडे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे. वास्तविक, प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावर किमान शिल्लक ठेवण्यासं सांगते.
जर तुमच्याकडे शून्य शिल्लक बचत खाते असेल म्हणजे जनधन खाते असेल तर अशा खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तरी देखील बँकेकडून कोणताच उदंड आकारला जाऊ शकत नाही.
पण, सर्वसाधारण बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. जर एखाद्या ग्राहकाने खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर बँका दंड आकारतात. हा दंड प्रत्येक बँकेत बदलतो.
दरम्यान आज आपण एसबीआय आणि एचडीएफसी या बँकेत सर्वसाधारण बँक ग्राहकाने किमान शिल्लक रक्कम ठेवलेली नसेल तर त्याला किती दंड भरावा लागू शकतो याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने किमान शिल्लक रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाहीये.
बँकेने सरासरी मासिक शिलकीचा नियम रद्द केला आहे. याआधी, मात्र एसबीआयच्या ग्राहकांना एक हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतची किमान रक्कम बँकेत ठेवावी लागत असे.
ग्रामीण आणि शहरी भागानुसार ही रक्कम वेगवेगळी होती. आता मात्र या बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून किमान शिल्लक रक्कम खात्यात नसली तरी देखील ग्राहकांना कोणताच दंड बसणार नाहीये.
एचडीएफसी बँक : ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील म्हणजेच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत शहरी भागात किमान 5,000 रुपये मासिक सरासरी शिल्लक राखावी लागेल. तसेच निमशहरी भागात 2,500 रुपये त्रैमासिक शिल्लक ठेवावी लागते.
किंवा मग शहरी भागातील ग्राहकांना किमान 10,000 रुपये किंवा 1 लाख रुपयांची एफडी आणि निमशहरी भागातील ग्राहकांना 25,000 रुपयांची एफडी करणे आवश्यक आहे. जर मंथली मिनिमम बॅलेन्स संदर्भातला हा नियम एखाद्या ग्राहकाने चुकवला तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो.