Banking News : भारतात बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठा रीफॉर्म पाहायला मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे आता देशात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. देशातील अगदी कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात आणि तळागाळातला आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज देखील बँकेशी जोडाला गेला आहे.
आता ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांची बँकेत खाते उघडली आहेत शिवाय त्यांचे बँकेतील व्यवहार देखील वाढू लागले आहेत. विशेष बाब म्हणजे देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. जर तुम्हीही अशाच लोकांमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.
तज्ञ लोकांनी एकापेक्षा अधिक बँक खाते ठेवणे नुकसानदायक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आता आपण बँकेत एक सेविंग अकाउंट असण्याचे फायदे आणि एकापेक्षा अधिक सेविंग अकाउंट असण्याचे नुकसान थोडक्यात समजून घेणार आहोत.
एकचं अकाउंट असेल तर मिळणार हे फायदे
तज्ञ लोकांच्या मते, जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल, तर तुम्ही एकापेक्षा अधिक बचत खात्यांपेक्षा एकच बचत खाते ठेवणे चांगले आहे. जर तुमचे एकच बँक खाते असेल तर असे खाते मेंटेन करणे सोपे असते.
तसेच जेव्हा तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरता तेव्हा तुमचे काम तुलनेने सोपे होते, कारण तुमचे बहुतांश बँकिंग तपशील एकाच बँक खात्यात उपलब्ध होऊन जातात. तसेच एकच Bank Account असेल तर काही आर्थिक फायदे देखील मिळतात. खरतर, बँकेकडून डेबिट कार्ड एएमसीवर बँक सेवा शुल्क, एसएमएस सेवा शुल्क आकारले जाते.
यामुळे एक बँक अकाउंट असेल तर हे शुल्क एकाच अकाउंट साठी भरावे लागणार आहे. तसेच बँक अकाउंट मध्ये किमान शिल्लक ठेवावी लागते. यामुळे जर एक अकाउंट असेल तर एकाच बँक अकाउंट मध्ये किमान शिल्लक मेंटेन करावी लागेल.
एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असल्यास हे नुकसान होते
फसवणूक होण्याची शक्यता वाढते : तज्ञ लोक सांगतात की, एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर फसवणूक होण्याची शक्यता वाढते. याचे कारण म्हणजे जर एकापेक्षा अधिक खाते असतील तर यात निष्क्रिय खाते सुद्धा राहू शकते. समजा एखादा पगारदार व्यक्ती आहे.
त्याने नुकतीच नोकरी बदलली आहे आणि तो त्याचे जुने पगार खाते विसरलाय. आता त्याचे आधीचे पगार खाते निष्क्रिय होणार आहे आणि नंतर या खात्याच्या माध्यमातून सदर व्यक्तीची फसवणूक होण्याची शक्यता वाढणार आहे.
CIBIL स्कोर कमी होऊ शकतो : एकापेक्षा जास्त बचत खाती असल्याने तुमच्या बँक खाते व्यवस्थापित करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकदा तुमच्या सर्वच बँक खात्यात किमान शिल्लक राहत नाही. जर तुम्ही तुमच्या सर्व बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम म्हणजेच मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही तर तुमचा सिबिल स्कोर डाऊन होऊ शकतो.
सर्व्हिस चार्ज भरण्याचे टेन्शन : अधिक बँक खाते असल्यास एसएमएस अलर्ट सेवा शुल्क, डेबिट कार्ड एएमसी आणि यासारखे विविध सेवा शुल्क आकारले जाते. यामुळे एकापेक्षा अधिक बँक खाते ठेवणे तुमच्या खिशाला देखील परवडत नाही. जर तुमच्याकडे एकच बँक बचत खाते असेल तर मात्र तुम्हाला या सर्व सुविधांसाठी त्या एकाचं बँक खात्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत.