Banking News : तुम्हीही कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेतले असेल ? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अनेकजण लवकरात लवकर हे कर्ज कसे फिटेल ? याकडे लक्ष देत असतात. होम लोन किंवा कार लोन घेतले असेल तर ते लवकर कसे फिटेल हेच आपण पाहतो.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून बँकेकडून घेतलेले होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज लवकर फेडले तर याचे काही नुकसान होते का ? यामुळे सिबिल स्कोर खराब होत असतो का असे सवाल उपस्थित केले जात होते? दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जस की आपणास ठाऊकच आहे की कर्ज घेतांना सिबिल स्कोर महत्त्वाची भूमिका निभावत असतो. बँका कर्ज देताना सर्वप्रथम सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर चेक करत असतात.
ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना लवकरात लवकर कर्ज मंजूर होते. तसेच कमी व्याजदरात अशा व्यक्तींना कर्ज पुरवले जाते.यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो.
अशा परिस्थितीत जर बँकेकडून घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडले गेले तर यामुळे सिबिल स्कोर डाउन होत असतो का ? हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.
लवकर कर्ज फेडल्याने सिबिल स्कोर डाऊन होतो ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेतलेले असेल आणि अशा प्रकारचे कर्ज सदर कर्जदाराने वेळेआधीच फेडले तर यामुळे सिबिल स्कोर डाउन होण्याची शक्यता असते.
असे केल्यास सिबिल स्कोरवर निगेटिव्ह प्रभाव पडतो. यामुळे जर तुम्ही वेळेआधी कर्ज फेडले तर तुम्हाला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. यामध्ये 750 ते 900 दरम्यानचा सिबिल स्कोर हा उत्कृष्ट मानला जातो.
जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर अशा व्यक्तीला कमी व्याजदरात आणि लवकर कर्ज मंजूर होते.
कर्जाची रक्कम देखील वाढू शकते. यामुळे सिबिल स्कोर कसा मेंटेन करायचा याकडे देखील विशेष लक्ष असणे आवश्यक आहे.