एसबीआय ग्राहकांसाठी गुड न्यूज ! ‘या’ FD स्कीममध्ये पाच लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 10 लाख, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI FD Scheme : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुदत ठेव केली जात आहे.

दरम्यान जर तुम्हीही एसबीआयच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे.

कारण की, आज आपण एसबीआयची अशी एक एफडी स्कीम जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदाराने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यांना दहा लाख रुपयांपेक्षा अधिकचा परतावा मिळणार आहे.

एफडीसाठी एसबीआयचीचे व्याजदर

एसबीआय बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीसाठी एफडी ऑफर केली जात आहे. तसेच वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीसाठी वेगवेगळे व्याज दिले जात आहे.

बँकेकडून सामान्य गुंतवणूकदारांना तीन टक्के ते 7.10% एवढे व्याजदर एफडी साठी दिले जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते पाच वर्ष कालावधीच्या एफडीसाठी मात्र 0.50 टक्के एवढे अधिकचे व्याजदर बँकेकडून पुरवले जात आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षाहुन अधिक अन दहा वर्ष कालावधी पर्यंतच्या एफडीसाठी एक टक्के अधिकचे व्याजदर दिले जात आहे.

पाच वर्षाहून अधिक आणि दहा वर्ष पर्यंतच्या कालावधीमधील एफडीसाठी एसबीआयकडून सामान्य गुंतवणूकदारांना 6.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याज दिले जात आहे.

5 लाखाच्या गुंतवणुकीचे कसे बनणार 10 लाख

जर समजा एखाद्या ग्राहकाने दहा वर्ष कालावधीच्या FD मध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सामान्य गुंतवणूकदारांना 6.50 टक्के व्याजदराने 9 लाख 52 हजार 779 रुपये मिळणार आहेत.

दुसरीकडे जर ज्येष्ठ नागरिकांनी दहा वर्षे कालावधीच्या एफडी मध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 व्याजदराने दहा लाख 51 हजार 175 रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment