मुंबईकरांसाठी गुड न्यूज…! ‘या’ मार्गावरही धावणार मेट्रो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. दरम्यान ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहेत.

यानुसार शहरात विविध मार्गांवर मेट्रो सुरू असून यामुळे मुंबईकरांचा प्रवासा आधीच्या तुलनेत अधिक सोयीचा झाला आहे.

दरम्यान मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीचा आणि आरामदायी व्हावा यासाठी आणखी एका मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात आली आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कल्याण ते तळोजा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन पूर्ण केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्ग 12 च्या कामाचा शुभारंभ अर्थातच भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले असून याप्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे.

खरेतर, कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबई हे शहर मेट्रो ने कनेक्ट होणार आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली येथील नागरिकांना अवघ्या 45 मिनिटात नवी मुंबई गाठता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.

या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी सक्षम होणार आहे.

एवढेच नाही तर या मेट्रो मार्गाच्या कामाचा आरंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजूरमार्ग ते बदलापूर यादरम्यानही मेट्रो मार्ग सुरू होणार अशी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे, कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कांजूरमार्ग ते बदलापूर हा प्रवास देखील भविष्यात मेट्रोने करता येणार आहे. याचे सुद्धा काम लवकरात लवकर होईल अशी आशा आहे.

तसेच या कार्यक्रमात शिंदे यांनी महाराष्ट्र पायाभूत पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक,जीडीपी मध्ये नंबर एक, परकीय गुंतवणूक नंबर एक, महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचे सांगितलं आहे.

Leave a Comment