Banking News : अलीकडे भारतातील अगदी तळागाळात वसलेला व्यक्ती देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. आता अनेकांचे बँकेत अकाउंट ओपन झाले आहे. विशेष म्हणजे काही लोकांकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. ग्राहक आपल्या गरजेनुसार विविध बँकांमध्ये अकाउंट ओपन करतात.
बँक अकाउंटचे वेगवेगळे प्रकार असतात. करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट, जनधन अकाउंट असे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या गरजेनुसार या प्रकारातील बँक अकाउंट ओपन करत असतात.
मात्र असे असले तरी अनेकांच्या माध्यमातून भारतात एक व्यक्ती किती बँक अकाउंट ओपन करू शकतो याविषयी विचारणा केली जात होते.
आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँक अकाउंट संदर्भात काही नियम तयार केले आहेत का? एक व्यक्ती किती बँक अकाउंट ओपन करू शकतो याबाबत आरबीआयचे नियम काय सांगतात असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत होता.
दरम्यान आज आपण याच संदर्भात आरबीआयने तयार केलेल्या नियमांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
RBI चा नियम काय सांगतो ?
भारतात एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकतो? याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने कोणत्याच नियम तयार केलेले नाहीत. यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.
म्हणजेच भारतात एक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार कितीही बँक खाती उघडू शकतो. यासाठी आरबीआयने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
तुम्ही जितकी जास्त बँक खाती उघडाल तितकी तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. खरंतर बँक अकाउंट मेंटेन करण्यासाठी बँक खाते धारकाला काही शुल्क भरावे लागते.
म्हणजे आपण इच्छित असल्यास, आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत किंवा इतर खाती देखील उघडू शकता. मात्र यासाठी तुम्हाला बँकिंगचे सर्व नियम पाळावे लागतील.
जर तुमचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असेल तर तुम्हाला त्या सर्व बँक अकाउंट साठी आवश्यक असलेले मेन्टेनन्स शुल्क भरावे लागेल. सर्व बँक अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करावे लागेल.