देशातील ‘ही’ बँक 399 दिवसांच्या एफडीवर देते 7.25 % व्याज, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरेतर एफडीमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे अनेकजण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. भारतात गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहे.

यामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यांसारखे जोखीमपूर्ण पर्याय देखील गुंतवणूकदारांपुढे आहेत. विशेष बाब म्हणजे या रिस्की ठिकाणी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अनेकदा चांगला परतावा देखील मिळतो.

परंतु येथे केलेली गुंतवणूक ही खूपच रिस्की असल्याने अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत.

मात्र एफडी मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कोणती बँक एफडी साठी चांगले व्याज ऑफर करते याविषयी विचारणा होत असते.

दरम्यान आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया च्या 399 दिवसांच्या एफडी योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 399 दिवसांच्या एफडीवर चांगले व्याज ऑफर केले जात आहे.

399 दिवसांचा एफडी साठी किती व्याज?

युनियन बँक ऑफ इंडिया कडून सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी एफडी ऑफर केली जात आहे. दरम्यान बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी साठी वेगवेगळे व्याजदर पुरवले जात आहे.

यामध्ये बँकेकडून 399 दिवसांच्या एफडी साठी 7.25% एवढे व्याज दिले जात आहे. हे नवीन व्याजदर 19 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान आता आपण या एफ डी मध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती परतावा मिळणार हे समजून घेणार आहोत.

दोन लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार

युनियन बँकेच्या 399 दिवसाच्या एफडी योजनेत दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर दोन लाख 16 हजार 278 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदाराला सोळा हजार 278 रुपये रिटर्न म्हणून मिळणार आहेत.

Leave a Comment