Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती बँकेने सोमवारी – एसीमनी (इंडिया) लिमिटेड या NBFC चा लायसन्स म्हणजे परवाना (नोंदणीचे प्रमाणपत्र – सीओआर) रद्द केले आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयच्या माध्यमातून देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहे. यामुळे सध्या बँकिंग क्षेत्रात मोठे भीतीचे वातावरण आहे. अशातच आता आरबीआयने काल देशातील आणखी एका बड्या एनबीएफसी कंपनीचे लायसन्स रद्द केले आहे.
आरबीआयला ही बँक चुकीच्या लँडिंग प्रक्रियेत गुंतलेली आढळली असून याच पार्श्वभूमीवर या सदर बँकेवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
यामुळे मात्र सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. आरबीआय ने याबाबत एक परिपत्रक काढले असून यामध्ये वेगवेगळ्या ॲप्सद्वारे ग्राहकांकडून जास्त व्याज आकारल्याप्रकरणी एसीमनी दोषी आढळली असल्याचे म्हटले गेले आहे.
एवढेच नाही तर या सदर वित्तीय संस्थेने ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुद्धा लीक केली आहे. हेच कारण आहे की याचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसीमनी ही वित्तीय संस्था 2017 मध्ये रजिस्टर झाली होती.
दरम्यान ही बँक आउटसोर्स वित्तीय सेवांमध्ये आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली आहे. विशेषत: एसीमनी वेगवेगळ्या थर्ड पार्टी ॲप्सद्वारे डिजिटल कर्जे वितरित करत होती, ज्यासाठी त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
RBI कायदा, 1934 च्या कलम 45-IA (6) अंतर्गत RBI ने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले गेले आहे. एकंदरीत ही वित्तीय संस्था वेगवेगळ्या थर्ड पार्टी अँप्सद्वारे कर्ज वाटप करत असल्याचे आढळून आले असल्याने हिचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे मात्र ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी आरबीआयने अनेक बँकांवर कठोर निर्बंध लावले आहेत. यात काही नॅशनल बँकांचा समावेश आहे तर काही सहकारी बँकांचा समावेश आहे. तसेच एसबीआय, एचडीएफसी यांसारख्या बड्या बँकांवर मागे दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.