अखेर निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला लागणार दहावी आणि बारावीचा निकाल, कोणत्या 7 वेबसाईटवर पाहता येणार रिजल्ट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th And 12th Result : सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र दुमदूमला आहे. दरम्यान या निवडणुकीच्या धामधूमित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल केव्हा जाहीर होणार आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. आता याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल नेमका केव्हा जाहीर होऊ शकतो याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.

हे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल आधी लागणार आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर बारावीचा निकाल हा 25 मे 2024 पूर्वी जाहीर केला जाणार आहे आणि दहावीचा निकाल हा सहा जून 2024 पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची आतुरता होती तो निकालाचा दिवस आता जवळ येऊ लागला आहे.

येत्या एका महिन्यात बारावीचा आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान आता आपण दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे पाहता येणार ? आणि निकाल कसा पाहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कुठे पाहणार निकाल

दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला रिझल्ट पाहता येणार आहे.

१) mahahsscboard.maharashtra.gov.in
२) mahresult.nic.in
३) results.gov.in
४) results.nic.in
५) hscresult.mkcl.org
६) mahahsc.in
७) mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. यानंतर होम पेजवर असलेल्या दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर मग विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. सीट नंबर आणि आईचे नाव टाकल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल स्क्रीनवर दिसणार आहे. या निकालाची प्रिंट आउट देखील घेता येणार आहे.

Leave a Comment