निवडणुकीच्या धामधूमीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीपासून मिळणार ‘हा’ लाभ, शासन आदेश जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा लाभ देण्यात आला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने बालशिक्षण भत्ता (CEA) आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वसतिगृह अनुदानाची मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवण्याच्या घोषणेनंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

2018 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जेव्हा महागाई भत्ता म्हणजे DA 50 टक्के होईल तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानात आपोआप 25 टक्के एवढी वाढ होईल.

जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय वित्त मंत्रालयाने 12 मार्च 2024 ला एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता मात्र यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला असून आता हा भत्ता 50 टक्के झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

यामुळे आता मुलांचा शैक्षणिक भत्ता (CEA) आणि वसतिगृह अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मुलाचा शिक्षण भत्ता 2,812.5 रुपये प्रति महिना असेल आणि वसतिगृह अनुदान 8,437.5 रुपये प्रति महिना एवढे राहणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलांचा शैक्षणिक भत्ता सामान्यपेक्षा दुप्पट असेल. म्हणजे हा भत्ता 5,625 रुपये प्रति महिना एवढा राहणार आहे. अपंग महिलांच्या बाल संगोपनासाठी विशेष भत्ता दिला जाणार आहे.

हा भत्ता 3,750 रुपये प्रति महिना एवढा राहणार आहे. विशेष बाब अशी की हे सारे भत्ते एक जानेवारी 2024 पासून म्हणजेच ज्या दिवसापासून महागाई भत्ता वाढला आहे त्या दिवसापासून वाढवले जाणार आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment