देशातील ‘या’ 5 सहकारी बँकांवर आरबीआयची मोठी कारवाई, वसूल केला लाखोंचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या माध्यमातून देशातील पाच प्रमुख सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संबंधित बँकेतील खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरे तर आरबीआय देशातील सर्व बँकांवर लक्ष ठेवून असते. बँकांना सेंट्रल बँकेने अर्थातच आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते.

ज्या बँका या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून मोठी कारवाई केली जाते. काही बँकांवर दंडात्मक कारवाई होते तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्याचा अधिकार आरबीआयला असतो.

दरम्यान याच अधिकाराचा वापर करून आरबीआय ने नुकताच पाच सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या बँकांवर झाली दंडात्मक कारवाई

आरबीआयने द को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, श्री भारत को-ऑपरेटिव्ह बँक, द लिमडी अर्बन को-ऑपरेटिव बँक, द संखेडा नागरिक सहकारी बँक, द भुज कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक या पाच बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

या बँकांकडून लाखो रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यामुळे लाखो ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बँकांवर दंडात्मक कारवाई झाली असल्याने ग्राहकांवर याचा काही विपरीत परिणाम होणार का हा सवाल उपस्थित होत आहे.

किती रुपयाचा दंड आकारला

आरबीआयने जारी केलेल्या सर्क्युलर नुसार या पाच बँकांवर 50 हजारापासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यामध्ये श्री भारत को-ऑपरेटिव्ह बँक आणि संखेडा नागरिक सहकारी बँक यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठेवण्यात आला आहे.

दि को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि द भुज कमर्शियल को-ऑपरेटिव बँक यांच्यावर प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच द लिमिडी को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर पन्नास हजार रुपयांचा दंड ठेवण्यात आला आहे.

या दंडात्मक कारवाईचा मात्र सदर बँकांच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. यामुळे ग्राहकांनी या कारवाईमुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असे बोलले जात आहे.

Leave a Comment