Banking News : भारतात आता खेड्यापाड्यातील शेतमजूरांपासून ते शहरात काम करणाऱ्या कामगारांपर्यंत सर्वजण बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. प्रत्येकाचेच आता बँकेत खाते आहे. तुमचेही बँकेत खाते आहे ना मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. कारण की, आज आपण सध्या सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमागील सत्यता जाणून घेणार आहोत.
खरे तर सोशल मीडिया युजर्सची संख्या ही अलीकडे वाढली आहे. आपल्यापैकी अनेक जण whatsapp, instagram, youtube, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असतील. तर तुम्ही नक्कीच सोशल मीडियामध्ये भारतीय निवडणूक आयोग तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम कपात करणार असा आशयाचा मेसेज वाचला असेल.
खरे तर सध्या सोशल मीडियामध्ये जे मतदार निवडणुकीत अर्थातच लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत त्यांच्या खात्यातून भारतीय निवडणूक आयोग 350 रुपये एवढी रक्कम दंड स्वरूपात कपात करणार असा दावा करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे जर सदर मतदाराच्या बँक खात्यात पैसे नसतील तर मोबाईल रिचार्जमधून सदर व्यक्तीकडून पैसे वसूल केले जातील असा देखील दावा या व्हायरल पोस्टमध्ये होत आहे. यामुळे भारतीय निवडणूक आयोग जर मतदान केले नाही तर खरंच पैसे कापणार का हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे ही पोस्ट इतकी वेगाने शेअर केली जात आहे की सर्वत्र पॅनिक वातावरण पाहायला मिळतय. परंतु सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेली ही पोस्ट साफ खोटी आहे. भारतीय निवडणूक आयोगाने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही.
तसेच निवडणूक आयोग असा निर्णय भविष्यात देखील घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्या व्हायरल करू नये असे आवाहन जाणकारांनी यावेळी केले आहे. खरेतर कोणाच्याही बँक खात्यातून कोणालाच विनाकारण पैसे कपात करता येत नाहीत.
तसेच भारतीय संविधानाने आपल्या देशात नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हा नागरिकांचा स्वतःचा स्वेच्छीक अधिकार आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. कोणीच मतदान विना राहू नये. मतदान करणे हा एक अधिकार तर आहेच शिवाय मतदान हे एका प्रकारचे दान आहे.
मतदान करून आपण आपल्या आवडीच्या लोकप्रतिनिधींना नियुक्त करतो. यामुळे देशाच्या विकासाला, आपला तालुका, जिल्हा, गावाच्या विकासाला चालना मिळते. यामुळे मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावणे अपेक्षित आहे.
परंतु जर कोणी काही कारणास्तव मतदान करू शकले नाही तर भारतीय निवडणूक आयोग किंवा इतर कोणतेच प्राधिकरण अथवा संस्था कोणाकडूनच कोणताच दंड वसूल करत नाही.
यामुळे निवडणूक आयोग जर मतदान केले नाही तर प्रति व्यक्ती 350 रुपये एवढा दंड वसूल करणार, ही रक्कम बँक खात्यातून कपात करणार असा जो दावा सध्या सोशल मीडियामध्ये होत आहे तो पूर्णपणे खोटा आहे.