Banking News : बँकिंग क्षेत्रासाठी आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय आयकर विभागाने देशातील एका बड्या बँकेवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय आयकर विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया या मोठ्या बँकेवर करोडो रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, या दंडात्मक कारवाईमुळे बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांमध्ये काहीशे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरेतर गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तसेच काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले आहे.
आता मात्र आरबीआय नंतर भारतीय आयकर विभाग देखील बँकांवर कठोर झाले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय आयकर विभागाने बँक ऑफ इंडियावर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आयकर विभागाने बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर 564.44 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.
परंतु ही पीएसबी आयकर विभागाच्या या कारवाईवर नाखुश असून सदर बँकेने आयकर आयुक्त नॅशनल फेसलेस अपील सेंटर (NFAC) समोर अपील दाखल करणार अशी माहिती दिली आहे. बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या संप्रेषणात त्यांच्यावर झालेल्या दंडात्मक कारवाईबाबत माहिती दिली आहे.
यामध्ये बँकेने असे नमूद केले आहे की, त्यांना प्राप्तिकर विभाग, असेसमेंट युनिटकडून आयकर कायदा, 1961 च्या कलम 270A अंतर्गत 2018-19 च्या मूल्यांकन वर्षाशी संबंधित एक आदेश प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये 564.44 रुपये दंड आकारला गेला आहे.
विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड लागू झाला असल्याचे बँकेने म्हटले आहे. या परिपत्रकात बँकेने, ‘बँकेचा असा विश्वास आहे की या प्रकरणातील आपली भूमिका न्याय्य करण्यासाठी पुरेसा तथ्यात्मक आणि कायदेशीर आधार आहे.
म्हणून, संपूर्ण दंडाची मागणी कमी होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर क्रियाकलापांवर कोणताही परिणाम होणार नाही. एकंदरीत आयकर विभागाने बँक ऑफ इंडियावर मोठी कारवाई केली आहे.
मात्र याचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे वाटत आहे. तसेच बँक या कारवाई विरोधात आव्हान देखील देणार आहे. यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.