Banking News : बँक खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर आपल्यापैकी बरेचजण आपल्या कष्टाने कमावलेला पैसा बँक खात्यामध्ये ठेवत असतात. बँक खात्याचे विविध प्रकार पडतात. करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट असे बँक खात्याचे प्रकार आहेत. मात्र सर्वसामान्य लोक प्रामुख्याने सेविंग अकाउंट ओपन करत असतात. सेविंग अकाउंट मध्ये अनेकजण मोठी रक्कम ठेवतात.
याशिवाय काहीजण बँकेच्या एफडी योजनेत देखील पैशांची गुंतवणूक करतात. अनेकांना असे वाटते की बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत. मात्र तसे नाही. जर समजा एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत ठेवलेले ठेवीदारांचे सर्वच पैसे सुरक्षित नसतात.
खरंतर आरबीआय ने बँकांना ग्राहकांच्या पैशांचा विमा उतरवणे बंधनकारक केले आहे. यानुसार बँक ग्राहकांच्या पैशांचा विमा उतरवलेला असतो. मात्र या अंतर्गत फक्त पाच लाख रुपयांपर्यंतची हमी मिळते. याचा अर्थ असा की जर समजा एखादी बँक बुडाली तर त्या बँकेतील ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे.
समजा दिवाळखोरीत निघालेल्या बँकेत एखाद्या व्यक्तीचे सात लाख रुपये असतील. यामध्ये त्याची मूळ रक्कम आणि व्याजाच्या रकमेचा समावेश असेल तर अशा प्रकरणांमध्ये त्याला फक्त पाच लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे उर्वरित दोन लाख रुपयांची रक्कम त्याला मिळणार नाही.
तसेच जर एखाद्या व्यक्तीचे चार लाख रुपये असतील आणि बँक दिवाळखोरीत गेली तर अशावेळी सदर व्यक्तीला त्याचे संपूर्ण चार लाख रुपये मिळू शकणार आहेत.यामुळे अनेकांच्या माध्यमातून भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या, भारतातील कोणत्या बँका कधीच बुडणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या?
आरबीआयने भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची ओळख पटवली आहे. देशातील तीन बँका सर्वात सुरक्षित मानल्या गेल्या आहेत. या बँका RBI च्या देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका/D-SIB अंतर्गत येतात.
या बँका उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आल्या तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आरबीआय आणि देशाच्या सरकारच्या मदतीने केला जाणार आहे. या एवढ्या मोठ्या बँका आहेत की त्यांच्या बुडण्याने संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे या बँका कधीच दिवाळखोरीत जाणार नाही असा दावा होत आहे.
म्हणजे या बँकांमध्ये ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत. RBI ने जाहीर केलेल्या सुरक्षित बँकांच्या यादीत एक सरकारी आणि 2 खाजगी बँका येतात. यातील पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वाधिक मोठी बँक सुरक्षित असून यामध्ये गुंतवलेला पैसा कुठेच जाणार नाही. ही बँक कधीच दिवाळखोरीत जाणार नाही. दुसरी बँक आहे HDFC. एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे.
ही देखील बँक सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. तिसरी सर्वाधिक सुरक्षित बँक आहे ICICI बँक. ही देखील एक प्रमुख खाजगी बँक आहे. RBI 2015 पासून ही यादी जारी करत आहे. 2017 मध्ये पहिल्यांदाच या यादीत HDFC चा समावेश करण्यात आला होता.