बातमी कामाची ! आता ‘या’ नंबरवर SMS करूनही मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter List Name : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. 18व्या लोकसभेसाठी यंदा एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होईल.

तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आज आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण घरबसल्या मतदार यादीत नाव कसे शोधायचे याविषयी माहिती पाहणार आहोत.

तुमचे मतदार यादीत अर्थातच वोटर लिस्ट मध्ये नाव आहे की नाही ? हे चेक करण्यासाठी आता एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हणजेच आता नागरिकांना एक एसएमएस करून त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करता येणार आहे. म्हणजेच इंटरनेटचा वापर न करता, वेबसाईटवर भेट न देताही आता लोकांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करता येणार आहे.

कोणत्या नंबर वर एसएमएस करावा लागणार

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना एसएमएस करून आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करायचे असेल त्यांनी 1950 या नंबर वर त्यांचा वोटर आयडी वरील EPIC नंबर पाठवायचा आहे.

जर समजा तुमचा एपिक नंबर 12345678 आहे तर तुम्हाला 1950 या नंबरवर EPIC 12345678 असा SMS करावा लागणार आहे.

तुम्ही एसएमएस पाठवल्यानंतर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही याबाबत निवडणूक आयोगाकडून तुम्हाला अवगत केले जाणार आहे.

याशिवाय तुम्ही electoralsearch.eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन मतदार यादीतील तुमचा तपशील तपासू शकता.

मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी लोकांना मोबाईल अँप्लिकेशनवर देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही व्होटर हेल्पलाइन ॲपची मदत घेऊ शकता. यावर तुम्ही तुमचे मतदान केंद्र देखील शोधू शकता.

Leave a Comment