Banking News : तुमचे बँकेत अकाऊंट आहे का ? नक्कीच असेल, मग आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. खरे तर अलीकडे अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. अनेकांचे पैशांचे व्यवहार अधिक होतात यामुळे बहुतांशी लोक मल्टिपल बँक अकाउंट ओपन करतात.
सेविंग, करंट, सॅलरी, स्कॉलरशिप, जनधन असे नाना प्रकारचे बँक अकाउंट आहेत. या बँक अकाउंट पैकी लोकं गरजेनुसार आणि आपल्या सोयीनुसार योग्य ते बँक अकाउंट ओपन करतात.
मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या स्वतःच्या बँक खात्यामधून पैसे काढण्यासाठी देखील टॅक्स द्यावा लागतो. कदाचित हा नियम तुम्हाला माहिती नसेल.
काही लोकांनी याबाबत ऐकलेले असेल मात्र आपल्या स्वतःच्या बँक अकाउंट मधून किती पैसे काढल्यानंतर किती टॅक्स द्यावा लागतो किंवा टीडीएस द्यावा लागतो याबाबत त्यांना माहिती नसेल.
यामुळे आज आपण याच संदर्भात असणारा आयकर विभागाचा नियम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर अनेकांना वाटते की त्यांच्या बँक अकाउंट मधून ते कितीही रक्कम विनामूल्य काढू शकतात. पण, असे होत नाही.
आयकर विभागाने एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात किती रक्कम कोणत्याही प्रकारचा कर न देता काढू शकतो? याबाबत नियम तयार केलेले आहेत.
आयकर विभागाच्या नियमानुसार जे व्यक्ती आयकर रिटर्न फाईल करत नाहीत, म्हणजेच ज्या व्यक्तींनी तीन वर्षांपासून आयकर रिटर्न भरलेला नाही अशा व्यक्तींना एका आर्थिक वर्षात वीस लाख रुपयांपर्यंतची रक्कम टीडीएस न भरता काढता येऊ शकते.
मात्र अशा व्यक्तींनी जर वीस लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काढली तर त्यांना टीडीएस भरावा लागतो. अशा व्यक्तींना 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस भरावा लागतो आणि 1 कोटींहून अधिक रक्कम काढल्यास 5 टक्के टीडीएस भरावा लागतो.
तसेच जें व्यक्ती आयकर रिटर्न भरतात त्यांना एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम टीडीएस न भरता काढता येऊ शकते.
मात्र अशा व्यक्तींनी जर एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काढली तर त्यांना अशा रकमेवर दोन टक्के टीडीएस भरावा लागतो.