Best Living Standard Top 10 Cities : उत्तम राहणीमानासाठी भारतातील सर्वात चांगले शहर कोणते ? कधी तुम्ही याचा विचार केला आहे का? नाही मग आज आपण ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या संस्थेने उत्तम राहणीमानासाठी अर्थातच लिविंग स्टॅंडर्डच्या बाबतीत चांगल्या अशा जगभरातील टॉप 1000 शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शहराचा देखील समावेश आहे.
या यादीत मुंबई आणि पुण्यानेदेखील बाजी मारली आहे. दरम्यान आज आपण ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या या यादीत भारतातील टॉप 10 शहरे कोणती आहेत, याविषयी माहिती पाहणार आहोत. खरंतर या संस्थेने अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, राहणीमान, पर्यावरण आणि प्रशासन व्यवस्थेसाठी चांगल्या असलेल्या शहरांची यादी जाहीर केली.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने मंगळवारी ही क्रमवारी जाहीर केली असून यात 1000 जागतिक शहरांचा समावेश आहे. दरम्यान आता आपण या यादीत समाविष्ट असलेल्या देशातील टॉप 10 शहरांची नावे पाहणार आहोत.
Top 3 मध्ये कोण-कोण ?
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या या यादीत देशाची राजधानी दिल्ली हे पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे हे लिविंग स्टॅण्डर्डच्या बाबतीत देशातील सर्वात चांगलं शहर बनले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीनंतर कर्नाटकची राजधानी बंगळुरूचा नंबर लागतो. म्हणजे बंगळुरू हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर देशाच्या आर्थिक राजधानीचा आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीचा म्हणजेच आपल्या साऱ्यांची जीवाच्या मुंबईचा नंबर लागतो. स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवूडनगरी मुंबई राहणीमानाच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात चांगले शहर ठरले आहे.
पुण्याचा नंबर कितवा ?
राजधानी मुंबई या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते मग पुण्याचा नंबर कितवा? तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर गेले आहे.
चेन्नई, कोची आणि कोलकत्ता या शहरांचा अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक लागतो. तर सातव्या क्रमांकावर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुण्याचा नंबर लागतो. पुण्यानंतर त्रिशूरचा नंबर लागतो.
त्रिशूर, हैदराबाद आणि कोझीकोडे यांचा अनुक्रमे 8वा, 9वा आणि 10 वा क्रमांक लागतो. पण, 1000 शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी दिल्ली 350 व्या क्रमांकावर आहे, मुंबई 427व्या क्रमांकावर आली आहे, तर पुणे हे 534व्या स्थानी बसले आहे.