Best Tourist Destination In The World : आपल्यापैकी अनेकांची विदेशात फिरण्याची इच्छा असते. परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत फॉरेन ट्रिप काढावी अशी इच्छा अनेकांनी उराशी बाळगलेली आहे. मात्र प्रत्येकालाच फॉरेन ट्रिप काढता येणे शक्य होत नाही.
पुरेसा बजेट तयार होत नसल्याने अनेकांची फॉरेन ट्रिप काढण्याची इच्छा अपूर्ण राहते. यामुळे आज आम्ही भारतातील अशा काही प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे भेट दिल्यावर फॉरेन ट्रिप सारखीच मजा नागरिकांना घेता येणार आहे. खरंतर, भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत जी विदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना मात देण्यास सक्षम आहेत.
यामध्ये कर्नाटक राज्यातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा देखील समावेश होतो. अशा परिस्थितीत आज आपण कर्नाटक राज्यातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेणार आहोत जे की सिंगापूर आणि स्कॉटलंड पेक्षाही भारी ठरणार आहेत.
कर्नाटकातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे खालील प्रमाणे
कुर्ग : वास्तविक कर्नाटक राज्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य खूपच मनमोहक आहे. कर्नाटक मध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यामध्ये कुर्ग या प्रसिद्ध पर्यटन स्थळाचा देखील समावेश होतो. हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ऑक्टोबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाण उत्कृष्ट आहे. हे एक सुंदर हिल स्टेशन असून येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. येथे भेट दिल्यानंतर तुम्हाला स्कॉटलंड सारखा अनुभव अनुभवायला मिळणार आहे. जर आपणास फॉरेन ट्रिप काढायची असेल मात्र पैशाअभावी ट्रिप काढता येत नसेल तर तुम्ही या ठिकाणाला एकदा भेट द्या. इथे गेल्यावर तुम्हाला फॉरेन ट्रिपचा देखील विसर पडणार आहे.
बेंगलोर : जर तुमची सिलिकॉन व्हॅलीला जाण्याची इच्छा असेल मात्र पैशाअभावी सिलिकॉन व्हॅली पाहता येत नसेल तर तुम्ही बेंगलोर शहराला भेट दिली पाहिजे. कारण की बेंगलोरला देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख प्राप्त आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. तुम्ही देखील येथे भेट देऊन तुमच्या ट्रिपचा आपल्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत आनंद घेऊ शकणार आहात.
गोकर्ण : कर्नाटकातील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजेच गोकर्ण. या ठिकाणाला देशभरातून लाखो पर्यटक भेटी देतात. विदेशातूनही हजारोंच्या संख्येने या ठिकाणाला भेटी देण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. गोकर्णाला लाभलेला समुद्रकिनारा हा खूपच खास आहे. यामुळे जर तुम्हालाही कुठे फिरावंसं वाटतं असेल तर या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.