हवामानात मोठा चेंज; राज्यातील ‘या’ भागात आगामी 2 दिवस पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ऑक्टोबर हिटमुळे, तापमान वाढीमुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. दरम्यान, राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.

ही बातमी आहे पावसाबाबत. हवामान विभागाने राज्यातील काही भागात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. खरंतर महाराष्ट्रासहित देशातुन मान्सून माघारी परतला आहे.

हवामान विभागाने काल अर्थातच 19 ऑक्टोबर रोजी राज्यासह संपूर्ण भारतातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अशातच मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विशेष बाब म्हणजे येत्या 24 तासात हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मग हा अति तीव्र कमी दाबाचा पट्टा 21 ऑक्टोबरला मध्यपूर्व अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आगामी दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाची उघडीप राहणार असून ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक जाणवणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आगामी दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संबंधित भागातील नागरिकांना उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

Leave a Comment