Panjab Dakh News : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. आता डिसेंबरचा दुसरा आठवडा देखील संपत चालला आहे. मात्र तरीही राज्यात अजूनही कडाक्याच्या थंडीला सुरुवात झालेली नाही.

मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे थैमान आता पूर्णपणे थांबले आहे. हवामान विभागाने मात्र 13 डिसेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे.

Advertisement

उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, काही ठिकाणी अंशता ढगाळ हवामान राहिल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढणार आहे.

आज राज्यातील बहुतांशी भागात सकाळी गुलाबी थंडीची चाहूल लागली. नासिक जिल्ह्यात काही भागात सकाळी-सकाळी हूडहुडी भरेल अशी थंडी पाहायला मिळाली.

Advertisement

मात्र अजूनही राज्यातील तापमान चढ-उतार सुरू आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून जे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत होते त्या अवकाळी पावसाचे थैमान आता पूर्णपणे थांबलेले आहे.

Advertisement

मात्र असे असले तरी डिसेंबर महिन्यात आणखी एक पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. यामुळे शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा चिंता वाढणार अशी शक्यता आहे.

डख यांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रातील हवामान आगामी काही दिवस कोरडेच राहणार आहे. विदर्भ व मराठवाड्यात प्रामुख्याने हवामान कोरडे राहील.

Advertisement

तसेच हळूहळू थंडीला सुरुवात होईल आणि यंदा मार्च महिन्यापर्यंत थंडी कायम राहील असे त्यांनी सांगितले आहे. पण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.

याशिवाय जानेवारी 2024 मध्ये देखील एक पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात वर्तवली आहे. यामुळे आता डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *