Bharat Ratna Award Aadwani : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधान महोदय यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच भारत रत्न जाहीर झाला असल्याची मोठी माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः माजी उपपंतप्रधान तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून अडवाणी यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.
सोशल मीडियावर काय म्हटलेत नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर म्हणजे एक्स हँडलवर याबाबत अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे.
मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अडवाणीजी आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत.
त्यांनी भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून त्यांचे देशातील विकासातील योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांचे जीवन हे तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे आहे.
त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही उत्तम काम केले आहे. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
कर्पूरी ठाकूर यांनाही मिळाला भारतरत्न
नुकत्याच काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना देखील भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला आहे.
विशेष म्हणजे कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंती दिनाच्या आधीचे त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. आता भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.