आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला अनेक सरकारी कामांसाठी व बँकिंगच्या कामांसाठी देखील आता आधार कार्डची आवश्यकता भासते. त्यामुळे आधारशिवाय बऱ्याच प्रकारची कामे तुम्ही करू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे.

आधार कार्डच्या संबंधित पाहिले तर अनेक फसवणुकीच्या घटना देखील घडत असल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग दुसरा कोणी करत नाही ना हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही तुमच्या आधार कार्डशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Advertisement

तुम्हाला जर आधार कार्डशी संबंधित होणारी फसवणूक किंवा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर टाळायचा असेल तर यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड तुमच्या मेल आयडीशी लिंक करणे गरजेचे आहे. यूआयडीएआय अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने आधार कार्डचा गैरवापर टाळता यावा याकरता अनेक सुविधा देखील उपलब्ध करून दिलेले आहेत.

समजा तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या ईमेल आयडीशी लिंक केले तर तुमचे आधार कार्डचा वापर दुसरे कोणी कुठे करत असेल तर तुम्हाला सहजपणे कळते. त्यामुळे तुमचा मेल आयडीशी आधार लिंक कसे करायचे हे आपण जाणून घेऊ.

Advertisement

 अशा पद्धतीने मेल आयडीशी आधार लिंक करावे

याबद्दल यूआयडीएने म्हटले आहे की, आधार कार्डमध्ये तुमचा ईमेल आयडी अपडेट आणि लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जाणे गरजेचे आहे. अशा आधार केंद्रांवर नवीन आधार कार्ड तयार करणे व ते अपडेट करणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात.

Advertisement

तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील तुमच्या आधार ऑनलाइन देखील अपडेट करू शकतात. जर तुमच्या आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर ते अपडेट करणे गरजेचे आहे. त्यामध्ये युआयडीएआयच्या माध्यमातून आधार कार्डधारकांना ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावे या संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याचे देखील सांगण्यात आलेले होते

व याकरिता तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्र मध्ये जाऊन यासंबंधी अशा गोष्टी पूर्ण करू शकतात. तसेच तुम्ही मेल आयडी जर आधारशी लिंक केले तर तुम्हाला आधार कार्डच्या वापराविषयी संपूर्ण माहिती मिळत राहते.

Advertisement

 या पद्धतीने ऑनलाईन बदला तुमच्या आधारवरील पत्ता

1- त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhar.uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

Advertisement

2- त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल व तुमची आधार अपडेटच्या पर्यायावर क्लिक करावे.

3- तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर अपडेट ऍड्रेसचा पर्याय निवडावा.

Advertisement

4- त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा आणि ओटीपी टाका.

5- ओटीपी टाकल्यानंतर डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडा.

Advertisement

6- त्यानंतर तुमच्या आधार संबंधित माहिती समोर येते.

7- त्यानंतर सगळा तपशील सत्यापित करावा आणि नंतर पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत व त्यानंतर आधार अपडेट प्रक्रिया एक्सेप्ट करावी.

Advertisement

8- त्यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर अर्थात युआरएन नंबर मिळतो व तो तुम्ही ट्रॅक करू शकतात.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार अपडेट ठेवू शकतात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *