तुमची देखील ऑनलाइन फसवणूक झाली आहे का? करा ‘या’ नंबरवर कॉल आणि मिळवा तुमचा पैसा परत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर भामट्यांच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. असे हे सायबर ठग वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून फसवणूक करताना आपल्याला दिसून येत आहेत. दररोज असे असंख्य प्रकरणे घडत असून अनेक लोकांच्या बँक खाते रिकामी होत आहेत.

जेव्हा एखाद्याला अशा पद्धतीने फसवणुकीला सामोरे जावे लागते तेव्हा संबंधित व्यक्तीला कळत नाही की आता काय करावे किंवा कुठे तक्रार करावी? जेणेकरून गेलेले पैसे परत मिळू शकतील. याकरिता आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून एक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे.

जर तुमच्या सोबत देखील अशी काही फसवणुकीची घटना घडली तर तुम्हाला या नंबर वर कॉल करावा लागेल व तुमच्या सोबत जी काही घटना घडलेली आहे त्याची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावर लवकर कारवाई सुरू केली जाते व तुमचे पैसे लवकरात लवकर तुम्हाला परत मिळतात.

 हा आहे हेल्पलाइन क्रमांक

केंद्रीय गृह मंत्रालयाने हेल्पलाइन क्रमांक 1930 जारी केला असून हा राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक आहे. यावर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ज्याला रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट झाले आहे त्याचे बँक वॉलेट तसेच नाव टाकू शकता. ज्या मधून रक्कम कापली गेली तो खाते क्रमांक/ वॉलेट आयडी,

ट्रांजेक्शन आयडी तसेच घटना घडल्याची तारीख व वेळ, याशिवायझर डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक  झाले असेल तर कार्डचा नंबर व व्यवहाराचा स्क्रीन शॉट व इतर महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला या हेल्पलाइनवर द्यावी लागतात. जेव्हा तुमची तक्रार नोंदवली जाते

तेव्हा तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे सिस्टम जनरेट केलेल्या लॉगिन आयडी किंवा पावतीचा क्रमांक मिळतो. त्यामध्ये लक्षात घ्यावे की कुठल्याही तुमच्या बँकेशी संबंधित व्यक्ती तपशील विचारला जात नाही. या तक्रार क्रमांकाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर तुम्ही तक्रार नोंदवताच कारवाई सुरू केली जाते. आतापर्यंत अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या अनेक व्यक्तींचे पैसे या माध्यमातून परत मिळाले आहेत.

Leave a Comment