Mumbai Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी ऐन दिवाळीच्या काळात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की, मध्य रेल्वेने राजधानी मुंबईहून एक नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ आणि जलद होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने मुंबई ते खानदेश नगरी धुळे दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून अर्थातच 12 नोव्हेंबर 2023 पासून होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून मुंबई ते धुळे एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद गतिमान आणि सुरक्षित होणार आहे. या ट्रेनमुळे धुळ्यासहित संपूर्ण खानदेश मधील रेल्वे प्रवाशांचा मुंबईकडील प्रवास आणखी सुलभ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. खरंतर दैनंदिन कामानिमित्त मुंबईहून धुळ्याला आणि धुळ्याहून मुंबईला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
हेच कारण आहे की धुळेसहित संपूर्ण खानदेशातील नागरिकांच्या माध्यमातून मुंबई ते धुळे एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मागणी केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई ते धुळे नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार असून संबंधित भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण मुंबई ते धुळे दरम्यान सुरू करण्यात आलेल्या नवीन एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत..
कसं राहणार वेळापत्रक?
हाती आलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक्स्प्रेस आजपासून म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२ वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्रमांक ११०१२ ही धुळे ते सीएसएमटी दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी १२ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होईल. ही ट्रेन धुळे येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचणार आहे.
कुठे राहणार थांबा
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा आणि शिरूड या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.