Wheat Farming : गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट तणनाशक कोणते ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. रब्बी हंगामामध्ये यावर्षी गव्हाची तसेच हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. खरंतर यंदा पावसाचे खूपच असमान वितरण आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला आहे तर काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यामुळे यंदा राज्यातील प्रमुख गहू उत्पादक पट्ट्यांमध्ये गव्हाची पेरणी कमी होऊ शकते अशी आशन्का व्यक्त केली जात आहे.

तथापि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते शेतकरी बांधव या रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करणार आहेत. वास्तविक, गहू हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. भारत हा गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर येतो.

आपल्या देशात गव्हाचे मोठ्या प्रमाणात सेवनही केले जाते. यामुळे भारतात गव्हाची मोठी खपत आहे. हेच कारण आहे की दिवसेंदिवस आपल्या देशात गहू लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. तथापि गव्हाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

गहू पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी तण नियंत्रण करणे देखील आवश्यक ठरते. तण नियंत्रणासाठी योग्य तणनाशकांची निवड करणे आवश्यक राहते. यामुळे आज आपण गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट तननाशक कोणते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट तणनाशके खालील प्रमाणे
पीक पेरणीनंतर अन तण उगवण्यापूर्वीची तणनाशके : पेंडीमेथीलिन ( टाटा पनिडा,स्टॉम्प ) – हे गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट तणनाशक आहे. पण याचा वापर हा पेरणीनंतर आणि तन उगवण्यापूर्वी करावा लागतो. गहू पेरल्यानंतर ताबडतोब याचा वापर केला पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दहा लिटर पाण्यासाठी 40 ते 50 मिली एवढे प्रमाण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गहू पेरणीनंतर अन तण उगवण झाल्यानंतर वापरायचे तणनाशक : फेनोक्साप्रॉप (व्हीप सुपर ) – हे गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट हर्बिसाइड आहे. पण याचा वापर तण उगवण झाल्यानंतर केला जातो. पिकास दुसरे पान आल्यापासून 70 दिवसांपर्यंत हे औषध वापरता येते. तथापि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने या तणनाशकाचा वापर करावा.

मेझॉसल्फयुरोन मिथाईल( अटलांटिस) – हे देखील गव्हाच्या पिकासाठी सर्वोत्कृष्ट तन नाशक आहे. गहू उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसात या तननाशकाचा वापर केला तर योग्य पद्धतीने तन नियंत्रण केले जाऊ शकते. या तणनाशकामुळे गव्हाच्या पिकाला थोडा शॉक बसू शकतो.

पिकाची पाने काही प्रमाणात पिवळी पडू शकतात. पण दोन आठवड्यात पीक पुन्हा एकदा ताजे आणि फ्रेश होते. पण हे तणनाशक फवारले आणि कडाक्याची थंडी पडली तर मात्र गव्हाला जास्त हानी होऊ शकते. यामुळे हे तणनाशक फवारणी करण्यापूर्वी कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा आणि कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला घेणे

तुमच्यासाठी आवश्यक राहील.
मेट्सुल्फुरोन मिथाईल ( अलग्रीप ) – हे देखील तन उगवण झाल्यानंतर वापरायचे एक प्रमुख तणनाशक आहे. गहू पिकासाठी हे हर्बीसाईड विशेष लाभप्रद ठरते. लागवडीनंतर 25 ते 35 दिवसात या हर्बीसाईडचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तणाला दोन ते चार पाने आली आणि जमिनीत ओल असली की या तणनाशकाचा वापर केला पाहिजे.

Leave a Comment