Bullet Train Project : देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत.
रेल्वे आणि रस्ते विकासाची विविध विकास कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे काही रेल्वे आणि रस्ते मार्गांच्या प्रकल्पाची कामे अजूनही सुरूच आहेत.
रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. विशेष म्हणजे बुलेट ट्रेन देखील येत्या काही वर्षांमध्ये रुळावर धावणार आहे.
देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम देखील सुरू झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणार आहे.सध्या या प्रकल्पासाठीचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.
खरंतर गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या अखेरीस या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे गुजरातमध्ये 100% भूसंपादन झाल्यानंतर आणि आपल्या महाराष्ट्रात 96 टक्के भूसंपादन झाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यात आले.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून भूसंपादननंतर स्थापत्य कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट दिलेली आहे.
त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून अर्थातच एक्स हॅण्डल वरून ही माहिती दिली आहे. रेल्वे मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन आता पूर्णपणे झालेले आहे.
म्हणजेच या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातही 100% जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. अर्थातच आता या प्रकल्पाचा संपूर्ण मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यात 951.14 हेक्टर, डहाणू मध्ये 7.90 हेक्टर आणि महाराष्ट्रात 429.71 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
खरे तर हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. परिणामी याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा प्रकल्प लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू झाला पाहिजे असा शासनाचा मानस आहे.
हेच कारण आहे की, या प्रकल्पासाठी जलद गतीने भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून आता येत्या काही वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा देखील सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.