व्यवसाय सुरु करायचाय ? मग ‘या’ दैनंदिन कामात उपयोगात येणाऱ्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरु करा, लाखों रुपयात कमाई होणार 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea In Marathi : अलीकडे विशेषता कोरोना काळापासून तरुणाईची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे. आता नोकरी ऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा अशी इच्छा तरुणांमध्ये प्रगल्भ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अस रुटीन काम करून तरुण वर्ग अक्षरशा उबगला आहे.

यामुळे आता नोकरीपेक्षा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र तरुणांपुढे कोणता व्यवसाय सुरू करायचा, व्यवसायासाठी भांडवल कुठून आणायचं हा मोठा प्रश्न उभा होत आहे. जर तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल आणि कोणता व्यवसाय सुरू करायचा याबाबत संभ्रमावस्थेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.

कारण की आज आम्ही तुमच्यासाठी एका भन्नाट अशा बिजनेस प्लॅन बाबत माहिती घेऊन जर झालो आहोत. आज आम्ही ज्या बिजनेस आयडिया विषयी सांगणार आहोत ही बिझनेस आयडिया खूपच चांगली कमाई करून देणारी ठरणारी आहे.

कोणती आहे ती बिजनेस आयडिया

आज आपण ज्या बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत तो बिजनेस आहे कटलरी युनिटचा. कटलरी वस्तू प्रत्येक स्वयंपाक घरात असतात. यामुळे कटलरी वस्तूंना बाजारात नेहमीच मागणी असते. अशा परिस्थितीत तुम्ही कटलरी वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार आहात.

विशेष बाब म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही हा व्यवसाय केंद्र शासनाच्या मदतीने सुरू करू शकता. केंद्र शासनाच्या पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते. यामुळे ज्या तरुणांकडे भांडवल नसेल ते देखील हा व्यवसाय सहजतेने सुरू करू शकणार आहेत.

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल

प्रत्येक व्यवसायासाठी सुरुवातीला एक मोठी गुंतवणूक करावी लागते. या व्यवसायासाठी देखील सुरुवातीला थोडीशी गुंतवणूक करावी लागणार आहे. खरंतर कटलरी भांडी बनवण्याचा व्यवसाय हा कायमच तेजीत राहणारा व्यवसाय आहे. मात्र दसरा दिवाळी लग्नसराई या काळामध्ये कटलरी भांड्यांना मोठी मागणी असते. यामुळे अशा काळात या व्यवसायातील तेजी दुपटीने वाढते.

जर तुम्ही ही कटलरी भांडी बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला सुरुवातीला साडेतीन लाखापासून ते चार लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक फिक्स कॅपिटल म्हणून करावी लागेल. मशीन, वेल्डिंग सेट, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्रिडर, पॅनल बोर्ड यांसारख्या मशिनरीज खरेदी करण्यासाठी तुम्हाला फिक्स कॅपिटल म्हणून दोन लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल.

तसेच कच्चा मालसाठी सव्वा लाख रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय ऑफिस, कर्मचारी आणि इतर कुशल कामगारासाठी तुम्हाला महिन्याला 30000 पर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. एकूणच हा व्यवसाय साडेतीन लाख ते चार लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो. विशेष म्हणजे यापैकी सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला स्वतः करावी लागेल आणि उर्वरित गुंतवणूक तुम्ही कर्ज स्वरूपात उभारू शकता.

किती कमाई होऊ शकते

या व्यवसायातून महिन्याकाठी सव्वा लाख रुपयांपर्यंतची उलाढाल होऊ शकते. जवळपास 80 हजाराच्या आसपास यासाठी खर्च करावा लागेल. म्हणजेच महिन्याकाठी 18 हजारापासून ते वीस हजारापर्यंतचा निव्वळ नफा तुम्हाला या व्यवसायातून राहू शकतो. इतर खर्च वजा करता तुम्हाला 15 ते 16 हजारापर्यंतची निव्वळ कमाई होऊ शकणार आहे.

Leave a Comment