व्यवसाय सुरू करताय? मग पंतप्रधान मोदींनी सुचवलेला ‘हा’ बिजनेस ट्राय करा, फक्त 5 हजारात सुरू होतो व्यवसाय, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea In Marathi : गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून तरुण वर्गाची मानसिकता बदलली आहे. तरुण वर्गाला बिजनेस करावासा वाटतोय. एक तर सरकारी नोकरी नाहीतर मग स्वतःचा हक्काचा व्यवसाय असे आता तरुणांनी मनोमनी ठरवले आहे.

आता तरुण वर्ग शिक्षणानंतर नोकरी मागे न धावता थेट व्यवसायात किंवा मग सरकारी नोकरीसाठी ट्राय करत आहे. जर तुम्हीही उच्चशिक्षित असाल आणि नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे.

खरंतर आपल्यापैकी अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असेल पण कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या एका बिजनेस बाबत माहिती देणार आहोत. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या पाच हजारात सुरू होणाऱ्या व्यवसायाबाबत माहिती देणार आहोत.

कोणता आहे हा व्यवसाय

हा व्यवसाय आहे जन औषधी केंद्राचा. जन औषधी केंद्रासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमोशन करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आता देशातील प्रत्येक भागात जन औषधी केंद्र उघडले जातील आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा नुकतीच लाल किल्ल्यावरून केली आहे. जन औषधी केंद्र हे एक प्रकारचे मेडिकल स्टोअर असते.

या मेडिकल स्टोअर मध्ये जेनेरिक औषधे मिळतात. ही औषधे स्वस्त दरात ग्राहकांना उपलब्ध होतात. त्यामुळे या औषधांची बाजारात नेहमीच मागणी राहते. साहजिकच, या व्यवसायातून चांगली कमाई होणार आहे. खरतर जेनेरिक औषध विक्रीवर खूप कमी प्रमाणात नफा मिळतो परंतु जर सेल चांगला राहिला तर या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. 

कोण सुरू करू शकतो जन औषधी केंद्र

जन औषधी केंद्र हे एका प्रकारचे मेडिकलच असते यामुळे हे केंद्र कोणीही सुरू करू शकत नाही. ज्यांच्याकडे डी फार्म किंवा बी फार्म ची डिग्री असते तेच जन औषधी केंद्र सुरू करू शकतात. जर तुमच्याकडे ही डिग्री नसेल तर तुम्ही डिग्री असलेल्या व्यक्तीस जन औषधी केंद्रावर नियुक्त करू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार जन औषधी केंद्र चालवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना किंवा लायसन्स फक्त 5 हजार रुपयांमध्ये मिळू शकते. याचाच अर्थ हा व्यवसाय फक्त 5000 सुरू होऊ शकतो. तसेच हे स्टोअर टाकण्यासाठी तुम्हाला 120 स्केअर फीट जागा असणे आवश्यक आहे. जागा स्वतःची असेल तर अति उत्तम किंवा आपण भाड्याची जागा घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Leave a Comment