Canara Bank FD Returns : FD करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एफडी म्हणजेच मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे यात शंकाच नाही.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांनी आता एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. आरबीआयने गेल्या काही वर्षात रेपो रेटमध्ये चांगली वाढ केली असल्याने याचा परिणाम म्हणून आता एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू लागला आहे.
दरम्यान, कॅनरा बँकेत जर एफडी करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की, आज आपण कॅनरा बँकेत एक लाख रुपयाची एफडी केली तर गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.
बँकेची 444 दिवसांची योजना
कॅनरा बँकेच्या माध्यमातून 444 दिवसांची एक विशेष एकटी योजना सुरू करण्यात आली आहे. ही 444 दिवसांची एफडी ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर आहे.
कारण की बँक यावर चांगले व्याजदर देत आहे. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.25% व्याजदराने परतावा दिला जात आहे.
अशा परिस्थितीत जर या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला किती मिळणार.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेत एक लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास अन 7.25 टक्के व्याजदराने परतावा मिळाल्यास या योजनेतून गुंतवणूकदाराला एक लाख आठ हजार 887 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच 8887 रुपये या एफडी स्कीम वरील व्याज राहणार आहे. मात्र हे व्याजदर सर्वसामान्य ग्राहकांसाठी लागू राहणार आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 0.50% अधिक राहते.
म्हणजेच या स्कीमसाठी वरिष्ठ नागरिकांना कॅनरा बँकेच्या माध्यमातून 7.75 टक्के व्याजदराने परतावा दिला जाऊ शकतो.